काष्टी येथील परिक्रमा पॉलिटेक्निकला अतिउत्कृष्ट(Excellent) श्रेणी प्रदान.



 श्रीगोंदा प्रतिनिधी - प्रा.अशोक राहिंज

  

         काष्टी येशील मा.श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट संचलित परिक्रमा पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल या विभागांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी अतिउत्कृष्ट (Excellent) श्रेणी प्रदान करण्यात आली त्याबरोबर कॉम्प्युटर व मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या दोन विभागांना उत्कृष्ठ श्रेणी प्रदान करण्यात आली.

          *एकाचवेळी तीन विभागांना अति उत्कृष्ट श्रेणी मिळवणारे परिक्रमा पॉलिटेक्निक हे श्रीगोंदा तालुक्यातील पहिले महाविद्यालय ठरले.* महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सर्वेक्षण समितीने महाविद्यालयास भेट दिली व त्याअंतर्गत महाविद्यालयाचे कामकाज व सुविधांची तपासणी करून ही श्रेणी प्रदान केली.

       या नेत्रदीपक यशाबद्दल परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, माजी नामदार बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव आ. श्री.विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते, ॲकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते, मुख्य अति. कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड, अती.ॲकॅडमी  डायरेक्टर डॉ.संजिवजी कदमपाटील,सायन्स कॉलेज प्राचार्य डॉ. पांडुरंग इथापे,तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, , इंजीनिअरिंग प्राचार्य मोहन धगाटे, एम.बी.ए. डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ डी.फार्मसी प्राचार्य रमेश शिंदे यांनी अभिनंदन केले.

       परिक्रमा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment