पुणे विद्यार्थी गृह संचलित कुलगुरू दादासाहेब केतकर इंग्लिश स्कूल प्री-प्रायमरी वर्गाचा उत्साहात प्रारंभ



 संतोष साळुंके नाशिक प्रतिनिधी -

 पुणे विद्यार्थी गृह संचलित कुलगुरू दादासाहेब केतकर इंग्लिश स्कूल प्री-प्रायमरी विभागाचा शुभारंभ आनंदायी आणि उत्साही वातावरणात पार पडला. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेश घेतलेले चिमुकले, बालगोपाळ आणि त्यांचे पालक यांची उस्फुर्त अशी उपस्थिती होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारी सजवलेले उंट, घोडे, आणि कार्टून पात्रांचे मिकी माउस, छोटा भीम, भव्य देखावे उभारण्यात आले होते. फुग्यांची सजावट, रंगीत आकर्षक रांगोळ्या आणि गोड स्वागत गीतांनी सर्वांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी मुलांसाठी सर्व वर्गात आकर्षक खेळणी,आनंददायी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. नाशिक शाखेचे संचालक तथा संस्थेचे उपकार्याध्यक्ष अमोल जोशी यांनी संस्थेच्या, शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत कार्यपद्धतीची माहिती दिली आणि बालगोपालांच्या शैक्षणिक प्रवासाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. आपली शाळा म्हणजे गुणवत्तापूर्वक इंग्रजी शिक्षण, मूल्यसंस्कार, बालमित्र वातावरण यांचा संगम असल्याचे सांगितले. संस्थेच्या शताब्दी महोत्सवात प्री-प्रायमरीच्या रूपाने नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याने आजचा दिवस महत्वाचा आहे असेही जोशी यांनी सांगितले. प्रारंभी सर्व नवागतांचे औक्षण करीत ढोल ताश्यांच्या गजरात सागत करण्यात आले. त्यानंतर संस्थापक कुलगुरू दादासाहेब केतकर यांच्या आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका दीपा अडोळे यांनी सूत्रसंचालन केले. सोनल जोशी यांनी अभ्यासक्रम आणि विविध कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. प्रा.दिलीप अहिरे यांनी आभार मानले. यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर निंबेकर, सुदाम सूर्यवंशी, सुनिल पावसे, मकरंद मुळे, विशाल गोवर्धने सर्व विद्यार्थी, पालक, हितचिंतक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment