स्वयंदीप सोशल फाउंडेशन संस्थेच्या वतीने शालोपयोगी साहित्याचे वाटप

 


संतोष साळुंके नाशिक प्रतिनिधी 

नाशिक : स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे संस्थेच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहातील २४० विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, दप्तर इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मुलींनी बुद्ध वंदना आणि स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमामध्ये स्वयंदीप सोशल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा विवेक वानखेडे , वर्षा प्रशांत चौरे, फाल्गुनी संजय सोनवणे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संस्थेचे सचिव पी. के.गायकवाड उमेश सोनवणे यांनी स्वयंदीप सोशल फाउंडेशन संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून उंच भरारी घ्यावी असे मार्गदर्शन केले.

स्वयंदीप सोशल फाउंडेशन संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहाबरोबरच शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत असून समाजातील उपेक्षित घटकांना मदतीचा हात देत आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत पार पडण्यासाठी मदत झाली आहे.

कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या माध्यमातून नियोजनपूर्वक केले होते. उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षिका बेबी डेरले यांनी केले. यावेळी सुरेखा पवार ,सुजाता भालेरावआदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.पालक,कर्मचारी,सर्व मुली उपस्थित होते.

No comments:

Post a Comment