"कलाशिक्षक:-श्री.राजेश्वर खेडेकर "अष्टपैलू साहित्यरत्न आणि अष्टपैलू साहित्य-जीवनगौरव"पुरस्काराने सन्मानित.

 



 तालुका प्रतिनिधी  विठ्ठल कत्ते 

 ‌. चिखली तालुक्यातील राजकीय पिंड असलेल्या अंत्री खेडेकर या छोट्याशा गावचे मूळ निवासी,कलेचा पिंड जोपासणारे, आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणारे निसर्गप्रेमी, नात्यातील ओलावा जपणारं व्यक्तिमत्त्व,कलेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तसेच कला व साहित्य विश्वात आपल्या अनोख्या कार्य शैलीने सुपरिचित असलेले एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्थानिक सहकार विद्या मंदिर देऊळगाव राजा येथिल कलाशिक्षक श्री.राजेश्वर खेडेकर सर.ज्यांनी गावकुसात भोगलेल्या जीवनशैलीने प्रभावीत होऊन कलेसोबतच आपला साहित्य कलेचा पिंड जोपासत "अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आयोजित "अक्षरमंच काव्यलेखन" समूहांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या अनोख्या काव्य शैलीत सामाजिक, आर्थिक व राजकीय विषयास हात घालीत सर्वोत्कृष्ट काव्यलेखन करुन सलग पाच वर्षे यशस्वी सहभाग नोंदविल्याने"अक्षरमंच काव्य समूहाने" सन २०२४ व सन २०२५ चा "अष्टपैलू साहित्यरत्न आणि अष्टपैलू साहित्य -जीवनगौरव"पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

          श्री.खेडेकर सरांच्या साहित्य क्षेत्रातील या दैदिप्यमान यशाचे कौतुक सर्वप्रथम त्यांचे आईवडील, अर्धांगिनी सौ.सपना खेडेकर मॅडम (महाराष्ट्र पोलीस), शालेय स्तरावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सजिथा सुरडकर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.संतोष मोहरीर सर, सहकारी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, सिंदखेडराजा मतदार संघाचे लाडके माजी आमदार मा.डॉ.शशिकांतदादा खेडेकर तसेच परममित्र सन्माननीय तहसीलदार साहेब श्री.श्याम धनमने सर, शिवाय फेसबुक, व्हॉट्स ॲप या सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री पर्वात जोडल्या गेलेल्या मित्रपरिवाराने श्री.खेडेकर सरांवर शब्द सुमनांची उधळण करीत सर्वांनीच त्यांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करीत पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.

     शेवटी खेडेकर सरांनी सर्वच स्तरातून आलेल्या शब्दरुपी शुभेच्छांचा मनस्वी स्विकार करुन सर्व शुभेच्छूक मैत्रीपर्वाचे मनापासून आभार व्यक्त केले.


No comments:

Post a Comment