अकरावी ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेची पर्यायी व्यवस्था करावी - आ. जितेश अंतापुरकर.




बिलोली प्रतिनिधी गणेश कदम. 


११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. संबधित विभागाच्या अनागोंदी नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षणापासून दुर राहण्याची दाट शक्यता आहे, या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत सरकारने तात्काळ ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेचा पर्याय खुला करावा," अशी मागणी देगलूर-बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी केली आहे.

आ. अंतापूरकर यांनी सभागृहात स्पष्ट केले की, देगलुर बिलोली मतदारसंघातील दहावी उत्तीर्ण होणाऱ्यां विद्यार्थी ची टक्केवारी लक्षणिय आहे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. पोलिटेक्निक, आयटीआय, नर्सिंग, शेती शाखांतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करूनही रोजगार मिळत नसल्याने विद्यार्थी आता पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखांत पदवी शिक्षणाकडे वळत आहेत. परंतु ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना वेबसाईट स्लो होणे, अनेक वेळा क्रॅश होणे, तसेच विहित कालमर्यादा ओलांडणे या तांत्रिक अडचणी समोर येत आहेत."

"ग्रामीण भागात अद्यापही दर्जेदार इंटरनेट सेवा नाही, विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रिया समजत नाही आणि संगणकीय कौशल्याचा अभाव आहे. अशा स्थितीत शासनाने ग्रामीण भागात किमान ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेस परवानगी द्यावी," अशी मागणी करत आ. जितेश अंतापूरकर यांनी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे असे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment