दिवा ते मुंब्रा दरम्यान झालेल्या अपघातात रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा, जनतेत प्रचंड संताप, मृतांना २५ लाख मिळावेत - रोहिदास मुंडे



पत्रकार अरविंद कोठारी

ठाणे: - मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील भयानक रेल्वे अपघात - रेल्वे प्रशासनाचा जीवघेणा निष्काळजीपणा उघडकीस आज सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेला भीषण अपघात हा केवळ अपघात नाही तर रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक पुरावा आहे. कसाराहून मुंबईला येणाऱ्या लोकल ट्रेनच्या दारावरून १० ते १२ प्रवासी पडले आणि त्यात ५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका सीआरपीएफ जवानाचाही समावेश आहेही घटना धक्कादायक आहे, गर्दीमुळे प्रवासी दाराला लटकून प्रवास करतात. ही बाब नवीन नाही, पण उपाययोजना करण्याची जबाबदारी कोणाची?

कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू हा रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे. हे फक्त एका प्रवाशाचा आधार नाही तर एका कुटुंबाचाही आधार आहे. "याला जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई करावी." यावेळी मुंडे यांनी खालील मागण्या केल्या आहेत: या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना किमान २५ लाख रुपये भरपाई देण्यात यावी. दरवाज्यावर टांगलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. दिवा ते मुंबई लोकल सेवा तात्काळ सुरू करावी. लोकल गाड्यांची वारंवारता वाढवून गर्दी कमी करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलावीत. ही घटना केवळ अपघात नाही, तर व्यवस्थेतील त्रुटींचे भयानक प्रदर्शन आहे. जेव्हा लोकांचे जीव धोक्यात असतात, तेव्हा याला "दुर्दैवी अपघात" मानून यावर उपाय करणे असंवेदनशील आहे, असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने आता जागे व्हावे.

भाजप दिवा शहराध्यक्ष सचिन भोईर म्हणतात की सरकारने मृतांना १० लाख रुपये मदत करावी आणि जखमींना सरकारी खर्चाने इलाज आणि २ लाख रुपये द्यावेमनसे दिवा शहर सचिव म्हणतात की असे निष्पाप जीव किती काळ गमावले जातील? दिवा येथून सीएमटी ट्रेन सुरू करावी आणि मृतांच्या कुटुंबियांना १० लाख ची मदत देण्यात यावी.


No comments:

Post a Comment