दाखला आपल्या दारी कार्यक्रमात आ . संतोष दानवे यांनी मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर.
नागरिकांची कामे वेळेत करण्याच्या दिल्या सूचना.. शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांगासह नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना दिले विविध दाखले तथा धनादेश.
टेंभूर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका येथील तहसीलच्या सभागृहात ७ जून शनिवार रोजी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या २९ मे ते १० जून पर्यंत दाखला दारी या उपक्रमांतर्गत शेतकरी कामगार ,कष्टकरी ,विद्यार्थी , मोफत बी-बियाणे महिला, शिधा पत्रिका, घरकुल, निराधार, तथा नैसर्गिक आपत्ती व वीज पडून मयत पावलेले जनावरे, यांना विविध दाखले व आपत्तीग्रस्तांना धनादेश आ .संतोष दानवे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले .
यावेळी आ. संतोष दानवे म्हणाले की घरकुलधारकांना बांधकामासाठी वनवन भटकून कणभर वाळू मिळत नसल्याने वाळू साठी लाभार्थ्यांची होत असलेली भटकंती बघून त्यांना शासनाची ५ ब्रास वाळू मिळावी हे धोरण आखले व अनेक घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम मार्गी लागलेली आहे .व आता शासनाने आणखी राज्यभरात दहा लाख घरकुलांना मंजुरी दिली आहे व हे ही कामे त्वरीत सुरू होणार आहे .मतदार संघात रस्ते वीज पाणी घरकुले शेतकऱ्यांना मोफत बिजवावी , मागेल त्याला सौलार,एसटी आगाराला पाच नविन बसेस तसेच विविध विकास कामे सुरू असून राज्य व केंद्र सरकार नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.संतोष दानवे यांनी दाखला आपल्या दारी या कार्यक्रमाप्रसंगी केले यावेळी तहसिलदार डॉ. सारीका भगत ,गट विकास अधिकारी एन.टी. खिल्लारे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे ,चेअरमन विजयसिंह परिहार , साहेबराव कानडजे ,संतोष लोखंडे , सुरेश दिवटे, दीपक वाकडे, मनोज शिंदे, विजय परिहार,नायब तहसिलदार मंगेश साबळे ,अमोल पडघन , कृष्णा माकोडे प्रमुख उपस्थिती होती .
पुढे बोलताना आ . दानवे म्हणाले की शहरासह तालुक्यात विविध योजनांचे घरकुलांची कामे सुरू आहे मात्र या घरकुलातील विविध धनादेश देण्यासाठी तथा जिओ टॅगिंगसाठी पंचायत समितीतील कर्मचारी व विशेषतः अभियंते तथा इतरही कार्यालयातील कर्मचारी नागरिकांच्या कामांसाठी आव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याची बाब निदर्शनास आली असून यापुढे अशा घटना पुन्हा ऐकायला मिळाल्या तर असे अभियंते तथा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असून कार्यालयात वेळेवर हजर न राहणे, नागरिकांच्या कामात जाणून बुजून दिरंगाई करणे , विविध कामांसाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करणे अशा मुजोर कर्मचारी तथा अधिकाऱ्यांवरही आमची करडी नजर असून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा कडक इशाराही त्यांनी दिला तर आपापल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिला यावेळी त्यांनी जाफराबाद तालुक्यातील घरकुला मिळालेल्या नवीन पाच बस गाड्यांचे लोकार्पण केले तसेच शासनाच्या महाडीबीटी मार्फत मिळालेल्या मोफत सोयाबीन बीजचे शेतकऱ्यांना वितरित केले तसेच विविध प्रकारचे दाखले दानदेश देऊन त्यांनी शासनाच्या विविध योजनांची उपस्थितांना माहिती दिली .
यावेळी महसूल ,पंचायत समिती ,कृषी अधिकारी कार्यालय तसेच विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी तथा तालुक्यातील विविध गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
No comments:
Post a Comment