भव्य महिला सर्वरोग महाआरोग्य मोफत शिबिर संपन्न



माडग्याळ  /  वार्ताहर 

दिनांक 6/06/2025 रोजी हिटटी हॉस्पिटल मातोश्री डॉ. सौ. शिवमाला हिटटी यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन मातोश्री डॉ. सौ. शिवमाला हिटटी  यांचे हस्ते करण्यात आले . सदर कार्यक्रमासाठी आसपास गावातील ग्रामस्थ व माडग्याळ परिसरातील लोकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मातोश्री डॉ. शिवमाला हिटटी म्हणाले की, सद्याच्या युगामधे आपल्या आरोग्यासाठी कोणती काळजी घ्यावी व आपले आरोग्य कसे निरोगी राहील व निसर्गात राहून पर्यावरण पूरक जीवन कसे जगावे ह्या बद्दल अतिशय उत्तम मार्गदर्शन मातोश्री डॉ. शिवमाला हिटटी यांनी केले . 

या आरोग्य शिबिरास मोठ्या प्रमाणात गरजू रुग्णांनी गर्दी केली होती यामध्ये २१० गरजू रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली त्यामध्ये ११० महिला रुग्णांनी सोनोग्राफी करून घेतली आणि ४५ रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली व इतर  ५५ रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतले त्यामध्ये ४ महिला रुग्णांनी ५०% सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी नाव नोंदणी केली. तर ७ रुग्णांनी नेत्र शस्त्रक्रियेसाठी  नोंदणी केली तसेच सर्व रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली  इत्यादी गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला . 

  हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नेताजी खरात, अजित नाईक, सुभाष मोरे ,विजय चौगुले, कैलास मोडे,  व हॉस्पिटल मधील सर्व स्टाफनी परिश्रम घेतले


No comments:

Post a Comment