लोकतंत्र सेनानी बाबू सिंह बिसेन यांचा गावकऱ्याकडून सत्कार...
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
महाराष्ट्र शासनातर्फे लोकतंत्र सेनानींचा जालना जिल्ह्यातील जाफराबाद तहसील मध्ये आणीबाणीच्या 50 व्या वर्षाच्या स्मरणार्थ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला याच धर्तीवर लोकतंत्र सेनानी बाबू सिंह बिसेन यांचा गावकऱ्याकडून आज शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सपत्निक सत्कार झाला यावेळी बाबू सिंह बिसेन यांच्या बद्दल मोहन मुळे यांनी त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा सांगितला त्यावेळी ते म्हणाले की बाबू सिंह बिसेन हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाल स्वयंसेवक राहिलेले आहे जाफराबाद शहरातील असंख्य धार्मिक व सामाजिक घडामोडी मध्ये ते अग्रेसिव्ह होते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले होते
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या उभारणीमध्ये पहिल्या फळीतील ते कार्यकर्ते राहिलेले असून गणेशोत्सव दुर्गा उत्सव यात ते प्रमुख होते शहरातील टिपऱ्यांचा मर्दानी खेळ जोपासून आजपर्यंत तो टिकून ठेवलेला आहे पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीच्या काळामध्ये ते भूमिगत राहून शेवटी त्याना अटक होऊन जेल भोगावी लागली या सर्व त्यांच्या देश एकसंघ राहण्याच्या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शेवटच्या टप्प्यात आर्थिक सहाय्य देऊन आधार दिला आज त्यांचा गावकऱ्याकडून सत्कार करतेवेळी अनिल कुमार खंडेलवाल , माजी जिल्हा परिषद सभापती रमेश धवलिया, गिरीश साबदे , राजेंद्र मगर, प्रमोद खंडेलवाल, मुन्ना बायस प्रभाकर गायकवाड, अजय मेठी मोहन मुळे यांचा सहभाग होता
No comments:
Post a Comment