इंग्लिश मीडियम स्कूल उंटवाडी येथे कालिदास दिन उत्साहात साजरा
संतोष साळुंके प्रतिनिधी नाशिक
"कालिदासो जने जने, कण्ठे कण्ठे संस्कृतम्".... असे म्हणत नाशिक एज्युकेशन सोसायटी च्या इंग्लिश मिडीयम स्कूल उंटवाडी या शाळेत कालिदास दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता आठवी ,नववी आणि दहावी च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, कालिदासांची माहिती, कथाकथन,वेषाभूषा अश्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करीत कालिदास दिन साजरा केला.संस्थेचे अध्यक्ष माननीय दिलीप फडके सर, उपाध्यक्ष आणि शाळा समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंढे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री चौधरी तसेच पर्यवेक्षिका सौ पूनम पेंडसे तसेच शाळेच्या संस्कृत शिक्षिका यांचे या कार्यक्रमांस मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Labels:
विशेष
No comments:
Post a Comment