शासकीय पुरस्कार प्राप्त तालुका शेतकरी संघ उमरखेड - अध्यक्षपदी शेती मित्र अशोक वानखेडे, सचिव पदी महेश्वर बिचेवार यांची निवड.
बाळासाहेब पवार प्रतिनिधी उमरखेड
कृषी व ग्रामीण क्षेत्रात शेतकऱ्यांच्या सर्वात आधी शेतीचे उद्दिष्ट समोर ठेवून कृषी उन्नतीसाठी शासकीय पुरस्कार प्राप्त तालुका शेतकरी संघ उमरखेड ची स्थापना 23 जून रोजी करण्यात आली आहे. या संघाच्या कार्याचे स्वरूप प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्याला सहाय्यक ठरणारे असेल.
. उमरखेड तालुक्यात महाराष्ट्र शासन व केंद्र शासन पुरस्काराने सन्मानित तालुक्यातील अशोक शिवराम वानखेडे सुकळी जहागीर ( शेती मित्र 2002, उद्यान पंडित पुरस्कार 2016 ) परमात्मा पांडुरंग गरुडे ब्राह्मणगाव ( शेतीनिष्ठ 2016 ) आनंद दिनकर गोविंदवार उमरखेड ( कृषी भूषण 2004 ) बाबाराव जाधव दहागाव ( सेंद्रिय कृषी भूषण 2010 ) महेश्वर प्रभाकर बिचेवार विडूळ ( शेतीनिष्ठ 2021 ) तालुक्यातील या सहा सन्मानाचा समावेश असून. महाराष्ट्र राज्याच्या महामहीम राज्यपालाच्या शुभ हस्ते या शेतकऱ्यांना राज्यस्तरावरील कृषी क्षेत्रातील बहुमनाची उपाधी देऊन बसविले आहे. हे शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याचे जिल्हा शासन स्तरावर भूषण समजले जातात.
. या संघाचे अध्यक्षपदी शेती मित्र अशोक वानखेडे, कार्याध्यक्ष शेतीनिष्ठ परमात्मा गरुडे, उपाध्यक्षपदी आनंद गोविंदवार, सचिव पदे शेतीनिष्ठ महेश्वर बिचेवार आणि संचालक म्हणून बाबाराव जाधव यांची एक मताने निवड झाली आहे.
. हे संघ शेतकऱ्याची व कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे शेतकरी हिताच्या कार्यप्रणालीला समन्वय सहाय्य करून तालुक्यातील तळागाळातील शेतकऱ्यांच्या शेती उन्नतीसाठी शासनाच्या प्रकल्प योजना शेतकऱ्यापर्यंत अमलात आणून पाठपुराव्यासह अंमलबजावणीची चळवळ जागृत करण्यास कार्यरत राहणार आहे. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकार आणि त्यांच्या श्रमाची सांगड घालण्याच्या मुख्य उद्देशाने हे संघ कार्यरत असणार आहे.
. या संघाला शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरावरचे मुख्य कार्यालय धुळे यांच्या कडून राज्यस्तरावरच्या संघाचे प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक व इतर अडचणी समाजशाचे निवारण व पाठपुरावा करण्यास राज्यस्तरातून सहायक बहुमूल्य सहकार्य लाभणार आहेत. आणि हा तालुका संघ या संघासोबत सलग्न आहे.
. तालुक्यातील या संघाच्या कार्याचे स्वरूप या क्षेत्रातील कृषी विभाग महाराष्ट्र शासन, व जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग कार्याला सहायक सहकारी ठरणारे असेल. या संघाचे तालुका नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष शेती मित्र अशोक वानखेडे यांनी प्रसारमाध्यमासमोर मांडले आहे.
No comments:
Post a Comment