बिलोली येथील क्रीडा संकुलनास आमदार जितेश अंतापुरकर यांनी दिली भेट.


तालुका प्रतिनिधी गणेश कदम. 

शहरातील क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी आज देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी क्रीडा संकुलास भेट दिली व कामाची पाहणी केली क्रिडा संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले असून लवकरात लवकर  काम पुर्ण व्हावी अशी मागणी क्रिडा प्रेमी कडुन होत आहे. शहरातील युवकांना पोलीस भरतीच्या ग्राउंड साठी अर्जापुर व  इतरत्र रनिंग साठी व्यायाम साठी जावे लागत आहे . शरीरासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. कबड्डीचे ग्राउंड, खो खो ग्राउंड, 400 मीटर मीटरचे रनिंग ट्रॅक , चेंजिंग रूम, बाथरूम, कंपाऊंड, रोशनाई ,  सीसी रस्ता आवश्यक आहे. लवकरच राहिलेले कामे पूर्ण करणार असल्याचे आमदार आंतापुरकर यांनी सांगितले. या वेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे,तहसीलदार गजानन शिंदे,  भाजपा अध्यक्ष इंद्रजित तुडमे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज अभियंता ज्ञानेश्वर चितळकर, पोलीस निरीक्षक अतुल भोसले ,बी.एम पाटील , संग्राम हायगले,नागेश येरावार,राजु गादगे, रमन आलुर, हज्जपा पाटील, मनोज आरळीकर क्रीडा अधिकारी सह अनेक जन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment