इंग्लिश मीडियम स्कूल उंटवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी संतोष साळुंके नाशिक
नाशिक:- (दि. २१ जून )रोजी इंग्लिश मिडीयम स्कूल उंटवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ.जयश्री चौधरी तसेच पर्यवेक्षिका सौ.पूनम पेंडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली.इयत्ता चौथी ची विदयार्थिनी महिमा पाटील हिने सूत्रसंचालन केले. त्यानंत्तर इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी श्रेया साखरे हिने योग दिनाची माहिती विषद केली. शाळेतील इयत्ता चौथी व सहावी च्या विद्यार्थ्यांनी विविध ध्यान धारणा,योगासने आणि सूर्यनमस्कार सादर केले. त्याचबरोबर इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी आरोही जोशी व विद्यार्थी भाविक काकडे यांनी सर्व आसनांचे फायदे मुलांना सांगितले.
मुख्याध्यापिका सौ.जयश्री चौधरी यांनी योगाचे आरोग्यासाठीचे महत्व सांगताना "योग केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे." असे नमूद केले.इयत्ता चौथी ची विद्यार्थिनी किंजल मोडक हिने आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता केली. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवीला.या कार्यक्रमास सौ.सोनी राजपुत,सौ. सुमती निमोणकर, सौ.चैताली क्षीरसागर, सौ.दर्शना पाठक या शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment