शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी- विकास सवडे

 



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आकोला देव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण समितीची निवड करण्यात आली यावेळी विकास नायबराव सवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

     आकोला देव येथे जिल्हा परिषदेची  शाळा पहिली ते सातवी असून  विद्यार्थी संख्या 185 आहे. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणाले की शाळेचा सर्वागीण विकास कसा करता येईल याकडे  पालकांच्या माध्यमातून वैयक्तिक लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी डॉ रामेश्वर सवडे, संतोष सवडे,अनिल सवडे,रामेश्वर सवडे,ऋषी घोडसे,संपत छडीदार ,शुभम घोडसे,यांच्यासह गावकऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार केला

No comments:

Post a Comment