प्रलंबित गुन्ह्याचा निपटारा करण्यात टेंभुर्णी पोलीस ठाणे जिल्ह्यात अव्वल -सपोनि सचिन खामगळ यांची उत्कृष्ट कामगिरी

   


टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी  पोलीस ठाण्यात प्रलंबित गुन्ह्याचे  प्रमाण अतिशय अल्प असल्याने टेंभुर्णी पोलीस ठाणे जिल्हात अव्वल ठरल्याने छत्रपती संभाजी नगर चे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते टेंभुर्णी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र देण्यात आले.

 जानेवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भाग 1 ते 5 ,भाग 6 चे एकूण 208 गुन्हे दाखल होते.त्यापैकी 172 गुन्हे निकाली काढले असून 36 गुन्हे प्रलंबित आहे त्यामुळे प्रलंबित प्रमाण  फक्त 17 टक्के आहे.  विशेष पोलीस महानिरीक्षक ,पोलीस अधीक्षक यांनी श्री खामगळ यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,पोलीस ठाण्याच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवून संबधित तपासीक अंमलदार यांना गुन्हे निपटारा करण्यात योग्य मार्गदर्शन केले असल्याने भरपूर गुन्हे निकाली काढले असून जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यापैकी आपली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे.भविष्यातही आपली कामगिरी अशीच राहून पोलिसांची प्रतिमा उंचवावी असे या सन्मान पत्रात नमूद केले आहे.टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावकऱ्यांकडून टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन खामगळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


गेल्या दोन वर्षांपासून आमच्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यात श्री सचिन खामगळ हे रुजू झाले तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही गुन्ह्याच्या प्रकरणात राजकारण केले नाही कुणासोबत ही दुजाभाव केला नसल्याने टेंभुर्णी हद्दीत त्यांची आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. असा अधिकारी टेंभुर्णी वासीयांना मिळाला नाही ,अतिशय उल्लेखनीय कामगिरी श्री खामगळ साहेबांची आहे 


           समाधान पाटील सवडे

No comments:

Post a Comment