शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करावे लोकजागर संघटनेच्या वतीने बॅकांना निवेदन
शेतकर्यांची अडवणूक केल्यास बॅंकासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार - केशव पाटील जंजाळ.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
सन २०२५-२६ साठी नवीन पिक कर्ज साठी शासन निर्णयानुसार कर्ज वाटप उदिष्ट नुसार नवीन शेतकऱ्यांना खरिप हंगामामध्ये तात्काळ नवीन पिक कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी लोकजागर संघटनेच्या वतीने केशव पाटील जंजाळ यांनी निवेदनाच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र दानापुर यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदन म्हटले आहे की,शेतकऱ्यांना खाजगी सावकराकडे जाण्याचे काम पडणार नाही. आपण तात्काळ निर्णय घेऊन नवीन पिक कर्ज वाटप करावी. आपण मागच्या हि काळात फक्त फाईल घेऊन ठेवल्यात परंतु मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहेत. त्यामुळे यावर्षात ज्या आपण फाईल घेतल्या आहेत. त्या लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या ही मागणी त्यांनी निवेदनातुन केली यावेळी उपस्थित,सचिन तेलंग्रे,शंकर तेलंग्रे,योगेश तेलंग्रे ,सागर तेलंगे,संतोष तेलंग्रे,ज्ञानेश्वर तेलंग्रे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
बॅकांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास आंदोलन छेडणार....
सध्या जाफ्राबाद-भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली असुन पावसाचा खंड पडल्यामुळे पिके पाण्याअभावी सुकुन चालले आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट देखील बळीराजा वर आले आहे.त्यातच कर्ज घेण्यासाठी शेतकरी बॅकांमध्ये जात आहे.शेतकर्यांना लवकरात लवकर कर्ज वाटप सर्व बॅकांनी कर्ज द्यावे. बॅकांनी शेतकऱ्यांची अडवूनक केल्यास त्या बॅंकासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत... केशव पाटील जंजाळ (लोकजागर संघटना जाफ्राबाद- भोकरदन)
No comments:
Post a Comment