शिरूरला बर्गे नकोच!" – मग्रुरी, वसुली, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त? शहरात रोषाचे वादळ...!




पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 


जनतेचा संताप — पण सत्तेची गुप्त छाया त्याच्यावर का?

🔸 रोजंदारीवर नाही, हफ्त्यावर जगणारा निरीक्षक?

🔸 "MRTP Act"चा अभ्यास बर्गेसाठी? प्रशासनाचं अजब तंत्र!

🔸 स्वच्छतेच्या आड वसुलीचा गंध, नागरिकांचे तोंड दाबले – पण जनमत उफाळले.!


शिरूर नगरपरिषदेचा स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय  बर्गे सध्या शहरात संतापाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मूळचा साताऱ्याचा असलेला बर्गे काही वर्षांपूर्वी शिरूरमध्ये रुजू झाला. पण गेल्या काही काळात त्याचा माज, मनमानी, हुकूमशाही व अडवणुकीची प्रवृत्ती यांनी सर्वसामान्य जनतेला नकोसा झाला आहे.

शहरात रोज पावतीबाहेर हप्ता घेतला जातो, बर्गेने नेमून दिलेली टोळी दुकानदारांवर तगादा लावते. फेरीवाल्यांपासून ते लहान व्यावसायिकांपर्यंत सर्वजण भीतीत आहेत. इतकेच नव्हे, तर घरासाठी लागणाऱ्या वस्तूंनाही पैसे न देता त्याच्या माणसांतर्फे दुकानांमधून उचल केली जाते, हे दृश्य शिरूरकर नागरिक अनेकदा पाहतात.

सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त मिळाल्यामुळेच दत्तात्रय बर्गे एवढा मग्रूर झाला आहे, असे शहरातील अनेक जागरूक नागरिकांचे मत आहे. मुख्याधिकारी देखील त्याच्या इशाऱ्यावरच निर्णय घेत असल्याचे उघड झाले आहे.


प्रशासनाकडून त्याला वाचवण्यासाठी विविध कायद्यांचा शोध लावला जात आहे. MRTP कायद्याचा अभ्यास करत त्याला सक्तीच्या रजेवरून वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे.

या संदर्भात महिबूब सय्यद – उपाध्यक्ष, मनसे, पुणे जिल्हा यांनी स्पष्ट शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले.

.

"शहरात लोक त्रस्त आहेत, पण बर्गेवर कारवाई ऐवजी त्याला अभय दिलं जातं, ही दुर्दैवी बाब आहे."

अनिल बांडे – अध्यक्ष, शिरूर प्रवासी संघयांनी सांगितलं.


"दर महिन्याला तीन-साडेतीन लाख रुपयांचे पाकीट कोणाला जातं, हे शहरात सर्वांनाच ठाऊक आहे. बर्गेचं 'कलेक्शन' कोणाच्या वरदानामुळे सुरक्षित आहे हे प्रशासनाने स्पष्ट करावं."

अविनाश घोगरे – तालुका संघटक, मनसे यांनी सांगितले.


"बर्गेचं साम्राज्य संपायला हवं! लोकांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या व्यक्तीला नगरपरिषदेच्या नावाने संरक्षण मिळतं हे लज्जास्पद आहे."

संदीप कडेकर – माजी शहराध्यक्ष, मनसे यांनी जोरदार भूमिका घेत म्हणाले.


 "बर्गे शहरात सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली हुकूमशहा झाला आहे. पण आता शिरूरकरांनी एकत्र येऊन या अराजकतेचा अंत केला पाहिजे."

ॲड. आदित्य मैंड – शहराध्यक्ष, मनसे  यांच्या यांनी सांगितले.

"प्रशासन त्याला वैद्यकीय रजेच्या नावाखाली वाचवतंय. पण बर्गेप्रकरणात कायदा आणि नैतिकता दोन्ही पायदळी तुडवली गेली आहे."

रवि लेंडे – शहराध्यक्ष, जनहित कक्ष, मनसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

 "जर कोणताही सामान्य कर्मचारी इतका संपत्तीशाली, राजकीय संरक्षण लाभलेला असेल, तर तो 'स्वच्छता निरीक्षक' नसून 'संपत्ती निरीक्षक' झाला आहे!

दरम्यान, शिरूर शहर विकास आघाडीतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने खुलासा केला की,"बर्गे दरमहा साडेतीन लाख रुपये 'वर' पाठवतो. आणि वक्ता स्वतःच पहिलं पाकीट घेतो – हे सर्वश्रुत आहे."

बर्गेने आजवर नगर परिषदेतील सर्व ठेकेदारांवर प्रभाव निर्माण करत, कोणाला कोणता ठेका द्यायचा हे स्वखुशीनं ठरवलं. याच प्रभावातून तो आज सुमारे १० कोटींच्या संपत्तीचा मालक बनला आहे, पुण्यातील उच्चभ्रू भागात ३ कोटींचा फ्लॅट असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

"बर्गे नको गावाला – पण शिंतोड्याचा प्रसाद मिळणाऱ्यांना मात्र तो हवाय.!"

शहरात हीच भावना दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

दत्तात्रय बर्गे याला तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून सखोल चौकशी व्हावी, हीच मागणी शहरातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाची आहे.शिरूरकरांचा ठाम इशारा – बर्गेचा त्रास सहन करणार नाही व  खपवून घेतला जाणार नाही.

No comments:

Post a Comment