शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद! गोसेखुर्द धरणातील पाणी सोडले — पाण्याखाली गेलेली पिके वाचणार
स्वप्नील खानोरकर
कुही:–गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा वाढविण्यात आल्याने धान, सोयाबीन पीके पाण्याखाली आली.शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान होत आहे. किमान 20 ते 25 दिवसासाठी धरणातील पाणीसाठा कमी केल्यास पिके शेतकऱ्याचा हाती येतील.त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमी करण्याच्या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे यांच्या नेतत्वात सहाय्यक आयुक्त प्रदीप कुलकर्णी नागपूर विभाग नागपूर, तसेच अधीक्षक अभियंता गोसेखुर्द जलसंपदा विभाग नागपूर पाटील यांना 10 ऑक्टोबर शुक्रवारला निवेदन देण्यात आले. त्यानुसार निवेदनाची दखल घेऊन धरणातील पाणी कमी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे धान उत्पादन व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला .त्यानुसार 11 ऑक्टोबर सकाळ पासून पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात झाली. याप्रसंगी सिर्सी ग्रामपंचायत चे सदस्य निखील धानोरकर, हरिदास लुटे, बालू आंबोने, फेंगडचे माजी सरपंच ललित भोयर, राजू चौधरी,शैलेश मेश्राम, शंकर ठाकरे, गोपाल डुंमरे,यशवंत ठाकरे, बाळकृष्ण ठाकरे, संकेत काळे, विक्की भांडे, शुभम डुंमरे,झिबल भोयर, प्रशांत शहारे, शुभम उके, रवी काळे, कैलास मलोडे, जगदीश पंचबुद्धे, संजय पाल , आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
No comments:
Post a Comment