ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील व प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान



 तालुका प्रतिनिधी- विठ्ठल कत्ते 

 हिंगोली येथे साथ फाउंडेशन तांदूळजा व सेवा सदन परिवार यांच्याद्वारे समाजाप्रती निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तीचा आणि संस्थांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला

 कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या वतीने त्यांच्या  परिवारातील सदस्य श्री नारायण भुतेकर, ज्ञानेश्वर भुतेकर व विठ्ठल कत्ते यांनी या पुरस्काराचा स्वीकार केलाहिंगोली येथे मागील सहा वर्षापासून सेवासदन परिवारा  कडून अनाथ अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी   मुलांचे वस्तीगृह चालवले जाते धनराज कदम व मीरा कदम हे वस्तीगृह चालवतात या वस्तीगृहामध्ये 70 मुले व मुली  शिक्षण घेत आहेत. आज पर्यंत या वस्तीगृहातील मुले मेडिकल, इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट,सीए महाराष्ट्र पोलीस इत्यादी क्षेत्रात उंच  भरारी घेत आहेत धनराज कदम व मीरा कदम मॅडम या मुलांचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात सेवा सदन वर्धापन दिन 22 जून 2025 रोजी संपन्न झाला.

 या कार्यक्रमासाठी आय आर एस ऑफिसर समीर वानखेडे व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सेवासदन परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती साथ फाउंडेशन तांदूळजा यांच्याद्वारे समाजाप्रती काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील व कमीत कमी खर्चामध्ये  स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा जिल्हा वाशिम यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 ज्या युवा तरुणांनी व्यवसाय उभा करून सामाजिक सहभाग घेतला अशा तरुणांचा युवा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांनी सेवा सदन परिवारातील विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जी काही मदत लागेल मोफत  उपलब्ध करून देईल असा शब्द दिला. या कार्यक्रमात सेवासदन वस्तीगृहातील मुला-मुलींनी समस्त महाराष्ट्राचे नव्हे भारताचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीची वारी या देखाव्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

 या कार्यक्रमासाठी धनराज कदम व मीरा कदम सेवासदन परिवारातील सर्व सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले.सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मीरा कदम यांनी केले.

No comments:

Post a Comment