"पुस्र्षोत्तम अँड कंपनी" या पेट्रोल पंप तात्काळ हटविण्यात यावा __ शिवसेना उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर

 




बाळासाहेब पवार प्रतिनिधी उमरखेड

दिनांक २०/०६/२०२५

सदर पेट्रोल पंपाची लीज मुदत समाप्त झालेली असून, ही जागा वर्दळीच्या भागात असल्याने खालीलप्रमाणे अडचणी व धोके निर्माण झाले आहेत:

1. वाहतूक कोंडी :- शहराच्या मध्यभागी असल्याने तसेच या ठिकाणी हनुमान मंदीर असल्यामूळे दर्शनाकरीता भाविक मोठ्या संख्येने येत असतात तसेच पेट्रोले पंपाचे समोरच्या बाजुस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे व उत्तर बाजुस महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यामूळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ सु डिग्री असते. यामुळे सदर पंपावर होणारी वाहनांची गर्दी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करते. त्यामूळे या ठिकाणी अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे व यापुर्वी या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत.

2. सुरक्षा धोका :- ज्वलनशील पदार्थ असलेल्या ठिकाणी मोठी लोकवर्दळ आणि वाहनांची वर्दळ ही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण करते. पेट्रोल हे ज्वलनशील पदार्थ असल्यामूळे या ठिकाणी मोठा अपघात होवुन हजारो नागरीकांचे जिव धोक्यात येवु शकतात.

3. पर्यावरण व ध्वनीप्रदूषण :- पंपाजवळील येणा­या वाळनाच्या सततच्या ध्वनी आणि धुरामुळे या ठिकाणी हनुमान मंदीराज दर्शनाकरीता येणा­या तसेच या ठिकाणी नगर परिषेचे मोठे व्यापारी संकुल असल्यामूळे खरेदी करीता येणा­या ग्राहकांना आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागतो.

4. सार्वजनिक हितास बाधा :- सदर शासकीय जागा शहराच्या ह्मदयस्थानी असून, ती इतर सार्वजनिक सुविधा जसे की वाहतूक नियमन केंद्र, पार्किंग आदींसाठी उपयोगात आणता येऊ शकते. तसेच या पेट्रोल पंपामुळे या ठिकाणावरुन जाणा­या राज्यमार्ग क्रं. 262 ची रुंदी अतिशय कमी करण्यात आली असुन, पंपाचे बाजुने नालीचे काम करण्यात आलेले नाही. त्यामूळे सदर ठिकाणाचे पावसाचे पाणी वाहुन जाण्यास अडथळा निर्माण होवुन सदर पावसाचे पाणी रस्त्यावर साचुन राहुन अपघात होवु शकतात.

5. सदरील पेट्रोल पंप लगत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यामुळे सदर पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अथवा वाद उद्भवल्यास त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास बाधा पोहोचू शकते व असे झाल्यास जातीय तेढ निर्माण होवुन दंगलीच्या घटना घडू शकतात त्यामुळे शांतता व सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच सदर पेट्रोल पंप चालकाने छपपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे बाजुने शौचालय व मुत्रीघर उभारलेले असुन, त्याचे घाण पाण्याचे आऊटलेट पुतळ्याचे बाजुने आहे, त्यामूळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याची विटंबना होवु शकते. तेव्हा सदरील पेट्रोल पंपाचे लिजची मुदत वाढवुन देणे लोकहिताचे होणार नाही.

त्यामूळे सदर पेट्रोल पंपाची लीज पुढे न वाढवता, तो तात्काळ हटवण्यात यावा आणि सदर शासकीय जागेचा उपयोग लोकहितासाठी करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर यांनी तहसीलदार उमरखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


No comments:

Post a Comment