जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड काका व जिल्हा पदाधिकारी यशवंतभाऊ पवार यांचे मार्गदर्शन



उमरखेड शहरात दोन मान्यवरांचा पक्ष प्रवेश व ढाणकी शहरात व्यापारी , रामराज्य संघटनेच्या युवकां सोबत तथा  शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा


बाळासाहेब पवार प्रतिनिधी

उमरखेड शहरात माजी उपजिल्हा प्रमुख कैलास कदम यांच्या रायगड या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक , सत्यसाई  संघटना अध्यात्मिक विभाग अमरावती ,  वारकरी संप्रदाय निस्वार्थ सेवेकरी तथा सामाजिक कार्यात अग्रेसर  श्रीराम चव्हाण यांनी व धर्मवीर संभाजी राजे बहुउद्देशिय संस्था वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव भालेराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला . तसेच ढाणकी शहरात उमरखेड तालुका महिला प्रमुख आशाताई कलाणे यांच्या निवासस्थानी रामराज्य संघटनेचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा झाली व येरावार यांच्या कृषी केंद्रात व्यापारी संघटना व  शेतकरी वर्गांनी आपल्या विविध समस्या मांडल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष श्रीधर मोहोड काका व शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी यशवंत भाऊ पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी महिला तालुका प्रमुख आशाताई कलाणे , माजी उपजिल्हा प्रमुख कैलास कदम , जेष्ठ शिव सैनिक  अनिलअण्णा नरवाडे , बसवेश्वर क्षिरसागर , छोटू शर्मा ढाणकी शिवसेनेचे संजय सल्लेवाड व नागेश दिलेवार , राजु गायकवाड , सुनिल शहाणे , अमोल सुर्यवंशी , दामोदर इंगोले आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment