चिंचणी गावातील अवैध दारु धंदे बंद करा; महिलांचा यल्गार; रुपाली चाकणकारांना साकडे...
पुणे प्रतिनिधी - अविनाश घोगरे
शिरूर, शिंदोडी येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री केली जात आहे. हि विक्री होत असल्यामुळे गावातील तरुणवर्ग दारुच्या आहारी जात असुन अनेक तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये वाद होऊन अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील अनेकजण दारु पिऊन महिलांना मारहाण करतात. त्यामुळे गावातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील सर्व अवैध दारुविक्री बंद करण्याबाबत चिंचणी येथील प्रगती महिला ग्रामसंघ तसेच गावातील सर्व महिलांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून दि.२८ जुन २०२५ रोजी महिला सभा घेऊन गावातील सर्व अवैध दारु विक्री धंदे बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव केला आहे. गावठाण तसेच गायरान व संपुर्ण गावात अनेक ठिकाणी अवैध दारुविक्री केली जात आहे.
याबाबत चिंचणी येथील प्रगती महिला ग्रामसंघ तसेच गावातील सर्व महिलांनी ग्रामसभेत ठराव केला आहे. गावातील सरपंच, उपसरपंच तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हाधिकारी, पुण्याचे विभागीय आयुक्त, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक, शिरुरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक या सर्वांना गावातील महिलांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे.
चिंचणी गावातील सर्व महिलांच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी गावात सगळीकडे शोध मोहीम राबविली. परंतु कुठेही अवैध दारुविक्री करताना कोणीही आढळुन आले नाही. संदेश केंजळे (पोलिस निरीक्षक)
शिरुर पोलिस स्टेशन
No comments:
Post a Comment