शिक्षक वर्गातच विद्यार्थ्यांसमोर पायवर करुन गाढ झोपला.
जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार .व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल.
टेंभूर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यांतील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक व्ही.के.मुंडे हे वर्गातच विद्यार्थ्यांसमोर पाय वर करुन गाढ झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग पहिली ते चौथीपर्यंत आहे ५३ ही विद्यार्थी संख्या आहे व तिथे दोन शिक्षक कार्यरत आहे.दोन्ही शिक्षक शाळेत उपस्थित होते. शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यातच व्हिडिओ गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतून समोर आला आहे. या झालेल्या प्रकारा विषयी गटशिक्षण अधिकारी डॉ. सतीश शिंदे यांना संपर्क केला असता चौकशी अहवाल तयार करून कारवाई करू असे त्यांनी सांगितले
Labels:
सामाजिक
No comments:
Post a Comment