शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जाफ्राबाद येथे शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जाफराबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले, तसेच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.एम.के.शेख होते. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.के.एस. पाटील, सुवर्णलंकार विविध विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन उदावंत हे होते.
यावेळी प्रा. डॉ. कैलास पाटील यांनी नागरी कर्तव्य व शिष्टाचार या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटनेतील ४२ वी घटनादुरुस्ती मध्ये समाविष्ट दहा मूलभूत कर्तव्य व २००२ मध्ये दुरुस्तीने समाविष्ट अकरावे कर्तव्य म्हणजेच सहा ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची पालकाची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करताना संविधानाचा आदर आणि पालन स्वातंत्र्यसंग्रामातील आदर्शाचा सन्मान भारताची अखंडता व एकतेचे संरक्षण देशसेवा व त्यागाची तयारी सामाजिक सौहार्घ व बंधुभाव राखणे स्त्रिया व मुलींचा सन्मान सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे यासह अन्य विषयांवर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गजानन उदावंत यांनी यशस्वी आयुष्याची पहिली पायरी म्हणजे ध्येय आणि त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न युवकांनी व्यसनापासून दूर राहून आत्मनिर्भर व्हावे, स्वयंरोजगारासाठी कौशल्य आधारित शिक्षणाचे महत्त्वही विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे असे यावेळी उदंड यांनी सांगितले. तर प्राचार्य शेख यांनी भारतातील वन पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाधव मोलाई पाईन यांचे उदाहरण दिले १६ वर्षापासून आसाममध्ये उच्च लागवड करून ५५० हेक्टर कोरडी जमीन एक संपन्न हिरवे जंगल बनली आहे त्यांनी केलेल्या कर्तव्याबाबत पर्यावरण संरक्षण सामाजिक भान आणि वैयक्तिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जे बी राठोड यांनी केले तर प्रास्ताविक जे डी चोतमल यांनी केले. आभार एस. व्हि. नायकवाडी यांनी केले. कार्यक्रमास श्रीमती शिवाय पेंढारकर, जी. एन.लांबे,आर.के.टेकाळे,बि.डी वाकेकर,श्रीमती सि.टी.खिल्लारे, अमोल गवळी,अमोल गावंडे,उबेद शेख, एस.यु गायकवाड,व्ही.एस फदाट, बी.एच शेलगावकर, सी.एम दांडगे, एस.टी राऊत यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात प्रा. डॉ. के.एस पाटील, गजानन उदावंत,प्राचार्य ए एम के शेख यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
No comments:
Post a Comment