जाफ्राबाद पोलीसांची अवैध दारूविक्रीवर मोठी धडक कारवाई — ६.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


टेंभूर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

 जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध देशी दारू विक्रीच्या विरोधात आज दिनांक ९ जून २०२५ रोजी महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एकूण ६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यालगत कोल्हापूर शिवारातील आसई फाट्याजवळ एका घरासमोर उभ्या असलेल्या मारुती स्विफ्ट डिझायर (MH-05-AX-8126) या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा असल्याचे समजले.

सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी पोउपनि पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. तपासणीदरम्यान, आंबादास जाधव रा. कोल्हापूर यांच्या आसई फाट्याजवळील घरासमोर ही गाडी सापडली. वाहनाची झडती घेतली असता, ‘भिंगरी संत्रा’ नावाच्या देशी दारूच्या १८० मिलीच्या ४८ सिलबंद बाटल्या असलेले एकूण ११ बॉक्स आढळून आले.त्यानंतर घरमालकास विचारले असता, सदर वाहन बालाजी साहेबराव जाधव रा. कोल्हापूर यांचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्या घराचीही झडती घेतली असता अजून १९ बॉक्स देशी दारूसाठा आढळून आला.

                                                    एकूण जप्त मुद्देमाल

या कारवाईत देशी दारू चे ३० बाॅक्स अंदाजे किंमत १,४४,०० रूपये व वाहन मारुती स्विफ्ट डिझायर कार किंमत पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख चौरेचाळीस हजार रुपचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. कुलकर्णी, व SDPO भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.कॉ. प्रताप इंगळे, वैशाली पवार,वासुदेव पवार, जनार्दन भापकर, गजानन गावंडे, अरुण वाघ, संदीप भागिले, संदीप गवई व होमगार्ड यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.


No comments:

Post a Comment