सत्तेच्या सिंहासनावरून थेट सामान्यांच्या सिटवर!
आ. संतोष पाटील दानवे यांचा लोकांनी भरलेल्या एस.टी. बसमधून थेट प्रवास!
जाफराबाद ते टेंभुर्णी बस फेरीचा भावनिक शुभारंभ…
विष्णु मगर टेंभुर्णी प्रतिनिधी
आजचा दिवस जाफराबादकरांसाठी विशेष ठरला!
सर्व सामान्य प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थीनी, विद्यार्थी यांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 13 नव्या बस सेवांचा लोकार्पण सोहळा पंचायती राज समितीचे अध्यक्ष, आमदार श्री. संतोष पाटील दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यामध्ये मानव विकास मिशनसाठी ८ बसेस आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ५ बसेस आजपासून कार्यान्वित झाल्या.
पण विशेष क्षण घडला तेव्हा...
लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रिबीन कापून थांबण्याऐवजी आमदार दानवे स्वतः सामान्य प्रवाशांप्रमाणे बसमध्ये चढले, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह जागा घेतली, कंडक्टरकडून तिकीटही काढले आणि जाफराबाद ते टेंभुर्णी पर्यंतचा प्रवास अगदी मनापासून केला. यावेळी तहसीलदार सारिका भगत, आगार प्रमुख रणजीत राजपूत, गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे, सुरेश दिवटे, विजूनाना परिवार तसेच एस टी महामंडळातील कर्मचारी गजानन चव्हाण , दिपक नाईक, सुनील वरगणे, पिंपळे , चालक वाहक यांची उपस्थिती होती.
सर्व सामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर सेवा देण्यासाठी लाल परी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आहे. मात्र स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षं उलटून ही अजुन बऱ्याच खेडेगावात बस पोहोचलेल्या नाहीत.तसेच जाफराबाद आगार निर्मिती पुर्वी पासुन आसरखेडा मार्गे जालना ते खासगाव ही बस चालु होती. पण काही वर्षांपासून ती बंद करण्यात आली असून आता तरी सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.एके काळी वेळेवर धावणारी एसटी बस म्हणून ओळख निर्माण झाली होती.पण कालांतराने वेळापत्रक कोलमडले आहे. याकडे जाफराबाद आगार व्यवस्थापक यांनी लक्ष घालून एवढी समस्या सोडाडवावी.
No comments:
Post a Comment