“निलेश वाळुंज यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सत्याग्रहाला अण्णा हजारे यांचा आशीर्वाद; निकृष्ट सार्वजनिक कामांविरोधातील लढा राज्यभर पोहचणार..!”
पुणे जिल्हा | प्रतिनिधी – अविनाश घोगरे
शिरूर, निकृष्ट दर्जाच्या, भ्रष्ट आणि अशास्त्रीय पद्धतीने झालेल्या सार्वजनिक रस्ते व पूल बांधकामांविरोधात निलेश वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सत्याग्रहासह उपोषण आंदोलनाचा प्रथम टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या राष्ट्रहिताच्या चळवळीत अनेक पत्रकार, सामाजिक संघटना, जागरूक नागरिक सहभागी झाले आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले.
अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन आणि ठाम पाठबळ
या आंदोलनाच्या आधीच निलेश वाळुंज यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता. काल पुन्हा आंदोलनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अण्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलनाची संपूर्ण माहिती व बातमीपत्रे त्यांच्यासमोर मांडली.
अण्णांनी बातमीपत्र वाचून आणि सर्व बाबी समजून
घेतल्यावर आंदोलनाचं प्रचंड कौतुक केलं आणि म्हणाले:
“ही केवळ स्थानिक लढाई नसून देशाच्या हितासाठीचा संघर्ष आहे. भ्रष्टाचार व निकृष्ट कामं ही देशाला लागलेली किड आहे – त्यामुळे हा लढा आता थांबवायचा नाही.“
अण्णांनी सांगितले की हे आंदोलन राज्यपातळीवर आणि पुढे देशपातळीवर पोहचायला हवे, यासाठी त्यांनी अमूल्य मार्गदर्शनही केलं.
मुख्य अभियंता हादरले – लेखी आश्वासन द्यावं लागलं
या चळवळीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना आंदोलनस्थळी यावं लागलं, आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची पाहणी करून लेखी आश्वासन द्यावं लागलं.
अण्णांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दात सांगितलं
“एका मुख्य अभियंत्याला घटनास्थळी पोहोचायला जर बारा दिवस लागतात, तर ही यंत्रणेची उदासीनता दाखवणारी गंभीर बाब आहे!“
यावेळी मुख्य अभियंत्यांचं नाव, ठिकाण आणि पद यांची माहिती अण्णांनी स्वतः विचारून घेतली.
पत्रकार बांधवांच्या भूमिकेचे अण्णांकडून विशेष कौतुक
पत्रकार बांधवांनी या आंदोलनाला दिलेल्या साथीस अण्णांनी विशेष दाद दिली.
निलेश वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली जे बातमीपत्र तयार करण्यात आले, त्याची स्तुती करत अण्णांनी पत्रकारांची नावे घेत कौतुक केलं:
जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर, अरुणकुमार मोटे, रवि खुडे सर, अविनाश घोगरे
अण्णांचे अमूल्य उपदेश – संघटित संघर्षाची हाक
अण्णांनी निलेश वाळुंज यांचं कौतुक करत पुढील महत्त्वाचे उपदेश दिले: “सुरुवातीला एकट्याने लढा सुरू करावा लागतो, पण योग्य उद्दिष्ट असलेल्या कार्याला चांगले सहकारी आपोआप मिळतात.” “कधीही गर्व किंवा अहंकार बाळगू नका; यश आल्यावर नम्र राहा.”
“भ्रष्ट व्यवस्थेविरोधात लढताना निर्भय राहा – तुम्ही जनतेसाठी लढत आहात!“
निलेश वाळुंज यांच्या नेतृत्वातील चळवळीचा ठसा
या आंदोलनामधून स्पष्ट होते की निलेश वाळुंज हे केवळ एक कार्यकर्ता नसून एक सजग, धैर्यशील आणि लोकहितासाठी निःस्वार्थपणे लढणारे नेतृत्व आहे. त्यांची सत्यासाठीची निष्ठा, अण्णांनाही जाणवली आणि त्यांनी त्या लढ्याला नैतिक पाठबळ दिलं.
पत्रकार नितीन बारवकर, अरुणकुमार मोटे, रवि खुडे सर अविनाश घोगरे सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक
ही लढाई निलेश वाळुंज यांच्यासारख्या निर्भय नेतृत्वामुळे एका नव्या परिवर्तनाचं कारण ठरेल. अण्णा हजारे यांचं मार्गदर्शन लाभलेलं हे आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी प्रेरणास्थान ठरेल, हे निश्चित!
No comments:
Post a Comment