शिरूरची 'महसूल'मुळे जिल्ह्यात आघाडी १०० दिवसांत १५३ कि.मी.चे २५ रस्ते खुले; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी मोहीम..!



पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 

शिरूर, जिल्ह्यातील प्रशासनाच्या "गतिमान १०० दिवस" मोहिमेअंतर्गत शिरूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. तालुक्यातील विविध गावांतील वादग्रस्त, अतिक्रमित व अनेक वर्षांपासून बंद असलेले पाणंद, शिवार रस्ते आणि शेतवाटा तब्बल १५३ किलोमीटर अंतराचे २५ रस्ते खुले करून देण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे.

या मोहिमेचे नेतृत्व शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी खंबीरपणे स्वीकारले. त्यांच्या पुढाकाराने तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समित्या राबवून, ग्रामस्थांशी संवाद साधून आणि कायद्याच्या चौकटीत राहून रस्ते उघडण्याचे काम शांततेत पार पडले.

तालुकास्तरीय समितीत भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमोल भोसले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी सक्रिय सहभागी झाले. ग्रामस्तरीय समित्यांत सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलिस पाटील आदींनी भूमिका बजावली.

 प्रमुख रस्ते आणि त्यांचे अंतर :

वडनेर खुर्द – पिंपरखेड : ४ कि.मी.

करंजावणे – रांजणगाव : २ कि.मी.

महादेव वाडी – धामारी : ५ कि.मी.

टाकळी भीमा – मीर गव्हाण वस्ती : ३ कि.मी.

शिक्रापूर रस्ता : ४ कि.मी.

पाबळ – लाखेवाडी : २ कि.मी.

डोंगरगण – दगडू शेंडगे वस्ती : १ कि.मी.

करडे – सरदवाडी : १ कि.मी. निमगाव म्हाळुंगी – कासारी : ५ कि.मी.

मांडवगण – शिरसगाव काटा : ३ कि.मी

(एकूण २५ रस्त्यांची सविस्तर यादी मुख्य अहवालात)

 राबविण्यात आलेली यंत्रणा 

महसूल विभागाकडे प्राप्त तक्रारी, गाव नकाशा व जमीन अभिलेखांची तपासणी संबंधित ठिकाणी महसूल पथकाची पाहणी ग्रामस्थांशी संवाद साधून समन्वय साधला जुनी कागदपत्रे, दस्तऐवज, व्यवहारांची पाहणी समजुतीच्या मार्गाने रस्ते खुले तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचे मत :"हे यश केवळ कायद्याचा धाक दाखवून मिळवलेले नाही, तर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, शांततेच्या मार्गाने मिळवलेले आहे. वर्षानुवर्षे वादात अडकलेले रस्ते आज खुल्या मार्गाने सर्वांसाठी खुले झाले आहेत."

शिरूर तालुक्याच्या प्रशासनाने दाखवलेली तत्परता, लोकसहभाग, आणि संवाद यशस्वी प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरते आहे. जिल्ह्यात शिरूरचा हा प्रयत्न 'ग्रामविकासाच्या मार्गावर' प्रभावी पावले टाकतो आहे.

No comments:

Post a Comment