शिरूर बसस्थानकावरून ८ तोळे सोने चोरीप्रकरणी दोन सराईत महिला चोरट्या जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कारवाई..!



शिरूर, बसस्थानकावर ११ मे रोजी दुपारी घडलेल्या सुमारे ४ लाख ६८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरीप्रकरणी दोन सराईत महिला चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. ही कारवाई श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील संजयनगर भागात करण्यात आली असून, चोरीस गेलेले सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

घटनाक्रम असा की, ११ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता फिर्यादी सौ. रूपाली अनिल काळे (रा. त्रीमुर्तीनगर, भिगवण रोड, बारामती) या आपल्या मुलगी व भाचीसह शिरूर बसस्थानकावरून एसटी (एमएच १४ बीटी ४१९३) मधून बारामतीस जाण्यासाठी चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ३,९०,००० रुपये किमतीचे ६.५ तोळ्यांचे गंठण व ७८,००० रुपये किमतीचे १.३ तोळ्यांचे झुबे असे एकूण ४,६८,००० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ३१४/२०२५ भा.दं.वि. कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप हे करत होते.

या गंभीर घटनेची दखल घेत मा. श्री. अविनाश शिळीमकर (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण) व मा. श्री. संदेश केंजळे (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन) यांनी विशेष तपास पथक तयार करण्याचे आदेश दिले. या पथकात स्थानिक गुन्हे शाखेतील पो. ह. तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन व शिरूर पोलीस स्टेशनचे पोसई शुभम चव्हाण, पोसई दिलीप पवार, पो. ह. नाथसाहेब जगताप, महिला पो. ह. भाग्यश्री जाधव, महिला पो. अं. मोनिका वाघमारे, पो. अं. नितेश थोरात, विजय शिंदे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यांचा समावेश होता.

तपासदरम्यान शिरूर, श्रीरामपूर व परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण** करण्यात आले. यासोबतच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्यात आला. यामध्ये चोरीप्रकरणी मनिषा विजय कसबे व शोभा शंकर दामोदर (दोघी रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांचे नाव पुढे आले.

त्यानुसार पोलिसांनी श्रीरामपूर येथे धाड टाकून या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीस गेलेले ६.५ तोळ्यांचे गंठण व १.३ तोळ्यांचे झुबे मिळून एकूण ४,६८,००० रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो. श्री. संदीप गिल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, **मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या संयुक्त कार्यवाहीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणेला मोठे यश मिळाले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment