राज्य मातेचा जीवनाशी खेळ तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्लास्टिक निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी चोख करण्या बाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणी
मलकापूर (प्रतिनिधी)
शहरात विकास कामे सुरू असून नाल्या रस्ते बांधकाम सुरू आहे. या खोदलेल्या नाल्यांमध्ये गोवंश पडून त्यांना इजा होत आहे. त्यामुळे गोवंश रक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतिने विविध मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मलकापूर नगरपरिषद यांना करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, शहरात मोकाट गोवंश शहरातील मोठ मोठ्या नाली मध्ये अपूर्ण विहीर बांधकाम असलेल्या विहिरीमध्ये नाली मध्ये पडतात. उकिरड्यावर प्लास्टिक पिशवी मधील अन्न प्लास्टिक पिशवी सह खातात. त्याने त्यांचा मृत्यू होतो, तसेच मोकाट शहरातील मुख्य रस्त्यावर दिवस-रात्र आपले पोट भरण्याकरिता भटकत असतात. त्यामुळे नागरिकांचे अपघात होतात त्यामुळे त्यांच्या मुक्या जीवा सोबत गावातील नागरिकांचे ही जीव धोक्यात येत आहे. यांचे उपाय योजना कराव्या गावातील कोंडवाडा सुरू करावे अशी विनंती केली आहे सदर निवेदनाची प्रतिलिपी मलकापूर मतदारसंघाचे आमदार, उपविभागीय अधिकारी तायडे साहेब,आरोग्य विभाग अजय बयस अधिकारी, मलकापूर नगर पालिका यांना ही देण्यात आल्या यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गतिविधि विभाग, दुर्गा वाहिनी मातृशक्ती , गो सेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment