‘म्हणजे वाघाचे पंजे’ – सामाजिक जाणीवेचा ठसा असलेला नव्या दमाचा मराठी चित्रपट; ३० मे रोजी साडेतीनशेहून अधिक चित्रपटगृहात भव्य प्रदर्शित..!
शिरूर,मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक संदेश, सशक्त अभिनय, उत्कंठावर्धक कथा आणि कौटुंबिक करमणुकीचा अनोखा संगम घेऊन येणारा ‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट ३० मे २०२५ रोजी राज्यभरातील साडेतीनशेहून अधिक चित्रपटगृहात भव्य प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. शिरूर येथील ऑक्सिगोल्ड चित्रपटगृहात देखील या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, शिरूरकर प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर समाजात घडणाऱ्या वास्तव घटनांवर विचारप्रवृत्त करणारा ठोस सामाजिक संदेशही देतो. प्रेक्षक या चित्रपटाला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील.”
मातृत्वाची साथ आणि गुणवत्तेची निर्मिती
चित्रपटाची निर्मिती त्रिशूलीन सिने व्हिजन या बॅनरखाली निर्मला बांदेकर यांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या तमन्ना बांदेकर या त्यांच्याच कन्या असून त्यांनी प्रमुख नायिकेची भूमिका साकारण्याबरोबरच सहनिर्मात्याची जबाबदारी ही समर्थपणे पार पाडली आहे.
तमन्ना बांदेकर – सॉफ्टवेअर इंजिनीयर ते रुपेरी पडद्यावरची चमक
तमन्ना बांदेकर या मूळच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर असून, इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात त्या कार्यरत होत्या. “कोरोना काळाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तमन्ना यांनी यापूर्वी तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय केला असून, त्यांच्या आणखी दोन चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
तगडे कलाकार, मजबूत सादरीकरण
चित्रपटात सौरभ गोखले, संजय नार्वेकर, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमघर यांसारखे मातब्बर कलाकार आहेत. तसेच निखिल चव्हाण, चिन्मय उदगीरकर, अनिल नगरकर, घन:श्याम दरोडे, सिद्धेश्वर झाडबुके हे तरुण कलाकारही या चित्रपटात आपली दमदार उपस्थिती दर्शवतात. अनुभव आणि नवतेजाचा उत्तम मेळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अवघ्या १८ दिवसांत निर्मिती – ‘चांद रात’ गाण्यासह संगीतमय मोहिनी
चित्रपटाची निर्मिती केवळ अठरा दिवसांत पूर्ण झाली असून, ही संपूर्ण टीमच्या एकजुटीचे आणि नियोजनबद्धतेचे फलित आहे. ‘चांद रात’ यासह चित्रपटातील इतर गाणी आधीच प्रदर्शित झाली असून, रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत. या गाण्यांनी कथेला अधिक उठावदार आणि भावनिक केले आहे, असा विश्वास दिग्दर्शक सावंत यांनी व्यक्त केला.
ओमस् आर्टस् – प्रसार व वितरणात अग्रणी भूमिका
चित्रपटाच्या प्रसारासाठी डॉ. संतोष पोटे आणि डॉ. सुनिता पोटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, ओमस् आर्टस्या बॅनरखाली आणि कौशल मेहता यांच्या सहकार्याने हा चित्रपट संपूर्ण राज्यभर पोहोचवण्यात येत आहे. यापूर्वी कोती आणि व्हिडिओ पार्लर यांसारख्या चित्रपटांचे यशस्वी प्रदर्शन त्यांनी पार पाडले आहे.
सामाजिक बांधिलकी – प्रत्येक चित्रपटात विचार
“आमच्या प्रत्येक चित्रपटामागे एक सामाजिक भान असते. केवळ करमणूक नव्हे, तर प्रेक्षकाच्या मनात विचारांची एक नवी खिडकी उघडावी, हा आमचा उद्देश आहे,” असे डॉ. सुनिता पोटे यांनी स्पष्ट केले.
शिरूरकरांसाठी विशेष निमंत्रण
शिरूरच्या ऑक्सिगोल्ड चित्रपटगृहात देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, “शिरूरकरांनी आपल्या कुटुंबीयांसह हा चित्रपट आवर्जून पहावा,” असे आवाहन डॉ. संतोष पोटे यांनी यावेळी केले.
३० मे पासून – समाजप्रबोधन व करमणुकीचा उत्कृष्ट मेळ अनुभवायला विसरू नका..!‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा चित्रपट समाजप्रबोधन, सशक्त अभिनय, उत्कंठावर्धक कथा आणि सुरेल संगीताचा अद्वितीय संगम आहे.३० मे २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ‘म्हणजे वाघाचे पंजे’ नक्की पहा आणि एक वेगळा अनुभव घ्या.संपूर्ण टीमकडून प्रेक्षकांना आवाहन – हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह पाहावा.
No comments:
Post a Comment