शिरूर शहरात तिरंगा पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद ‘ऑपरेशन सिंदूर’मधील सैन्याच्या अद्वितीय शौर्याचा गौरव; पावसातही न थांबता शिरूरकरांची देशप्रेमाने ओथंबलेली कृतज्ञता..!



पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे

शिरूर, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्यदलाने केलेल्या अद्वितीय व शौर्यपूर्ण कारवाईचा गौरव करण्यासाठी आणि कठीण परिस्थितीत भारतीय नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने शिरूर शहरातून आज भर पावसात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान जय किसान’ च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला.या पदयात्रेत सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, महिला, युवक, सर्वधर्मीय नागरिक, अबालवृद्ध अशा सर्व स्तरांतील नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन, शिस्तबद्ध संचलन

शिरूर बाजार समितीच्या आवारात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि ‘शिवरायांचा जयजयकार’ व ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी सुरुवात करण्यात आली. माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे शिस्तबद्ध संचलन करण्यात आले.यात्रेच्या अग्रभागी दिल्लीतील ‘अमर जवान स्मारक’ याची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. अबालवृद्ध नागरिकांनी तिरंगे झेंडे आणि भारतीय सैन्याच्या शौर्यगाथांचे फलक हातात घेतले होते.महिलांनी "धर्म पूचकर सिंदूर मिटाया, वही सिंदूर बारूद बनकर बरसाया" या आशयाचे फलक घेतले होते, जे विशेष लक्षवेधी ठरले.

                                 हुतात्मा स्तंभाजवळ श्रद्धांजली, राष्ट्रप्रेमाचा गजर

पदयात्रा हुतात्मा स्तंभाजवळ पोहोचताच ‘भारत माता की जय’* चा गजर टीपेला पोहोचला. शिरूर तालुका माजी सैनिक संघटनेचे सल्लागार बापूसाहेब कोहकडे यांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

निवृत्त कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांचे विचार

“पाकिस्तानला बेचिराख करण्याची धमक भारतीय सैन्यात असून, ऑपरेशन सिंदूर ही फक्त संपलेली कारवाई नसून ती केवळ स्थगित झाली आहे. आपल्या सैन्याची दखल जगभरात घेतली जात आहे,” असे निवृत्त कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांनी यावेळी सांगितले.

विठ्ठलराव वराळ यांचा गौरवोद्गार

राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून सेवा बजावलेले विठ्ठलराव वराळ यांनी “भारतीय सैन्याची ताकद पाहून आता चीन व पाकिस्तान यांच्यात कुरापती काढण्याची हिंमत राहिलेली नाही. कारण त्यांनी आता बदललेला भारत अनुभवलेला आहे,” असे ठामपणे सांगितले.

राहुल पाचर्णे यांची भूमिका स्पष्ट

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांनी सांगितले की, “देशप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर रुजावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यदलाने दाखवलेल्या अद्वितीय शौर्याचा गौरव करण्यासाठीच ही पदयात्रा काढण्यात आली.”

 नेत्यांचा तीव्र निषेध आणि गौरवोद्गार

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, भाजप उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ मांढरे, माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहर कार्याध्यक्ष हाफीज बागवान यांनी आपल्या मनोगतात अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा आणि पाकिस्तानच्या छुप्या कारवायांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

 उमेश शेळके यांचे आभार प्रदर्शन

बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश शेळके यांनी सर्व मान्यवर, सहभागी नागरिक, महिला व तरुणांचे आभार मानून ही तिरंगा पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर – राष्ट्रासाठी एकजूट

या भव्य रॅलीत सहभागी झालेल्या मान्यवरांमध्ये –भाजप तालुका संपर्कप्रमुख बाबूराव पाचंगे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित डोंगरे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष एकनाथ शेलार, भाजप तालुका सरचिटणीस दिलीप हिंगे, ॲड. मदनदादा फराटे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवानराव शेळके, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रिया बिरादार, शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख पाटील, माजी नगरसेवक संदीप गायकवाड, माजी नगरसेवक विनोद भालेराव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नाना पोटे, गणपतराव फराटे, माजी सैनिक महादेव घावटे, खंडु बो-हाडे, मेजर नामदेवराव घावटे, पाटीलबुवा पाचर्णे, नितीन थोरात, बबनराव पवार, माजी शहराध्यक्ष ललित नहार, भाजपा माजी शहराध्यक्ष केशवराव लोखंडे, ॲड. एकनाथ शेलार**, भाजपा शिरूर शहर सरचिटणीस विजय नरके, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, भाजप शिरूर शहर उपाध्यक्ष नीलेश नवले, युवा नेते सागर नरवडे, भाजप सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, भाजप शिरूर सरचिटणीस अविनाश जाधव, उद्योजक अमोल महाजन, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष मितेश गादिया, शिवसेना अध्यात्मिक तालुका प्रमुख बाळू महाराज जोशी, मनसे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, उद्योजक महेंद्र बोरा, भाजप सरचिटणीस नवनाथ जाधव राहील शेख आदींचा समावेश होता.

 शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पावसात भिजतही शेकडो नागरिकांनी राष्ट्रप्रेमाने भारावून जाऊन हुतात्मा स्तंभावर एकत्र येत ही तिरंगा पदयात्रा राष्ट्रनिष्ठा आणि सैन्यदलाच्या शौर्याचा प्रतीक ठरवली


No comments:

Post a Comment