घरकुल लाभार्थ्यांना लवकरच वाळू उपलब्ध करून देऊ; तहसीलदार गजानन शिंदे.
प्रतिनिधी गणेश कदम.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने बिलोली तहसील कार्यालया येथे दिनांक 20 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते तहसीलदार गजानन शिंदे यांनी भेट देऊन लवकरच ५ ब्रास वाळु उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यात यावी, निराधार लाभार्थ्यांना गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यांचे अनुदान थकले असून त्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, राशन कार्ड धारकांना राशन मिळत नाही अशांना राशन देण्यात यावे .नवीन नावाचा समावेश करण्यात यावा, तालुक्यातील अवैध वाळू ,गिट्ठी, मुरूम ,माती वाहतूक करणारा दंडात्मक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात अवैध धंद्याने जो धरला असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
घरकुल लावा वाळू मिळत नाही पण अवैध वाळू उपसा करून लाखो रुपये कमवण्याचा धंदा तालुक्यात जोर धरला आहे कारण अनेक दिवसापासून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदरील धंदे डोकेवर काढले आहे याकडे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आरटीओ संबंधित महसुली विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. आरटीओ कार्यालय परिसरामध्ये अवैध वाहतूक होत असताना आरटीओ मात्र कुठे आहे असा सवाल नागरिक करत आहे. वर लोड वाहनावर कारवाई करण्याचा अधिकार आरटीओ आहे मात्र आरटीओ कुठे आहे हेच पत्ता नाही . बिलोली तहसील कार्यालय पोलीस ठाणे समोरूनच टाईम संपल्यावर देखील वाळू वाहतूक होत आहे कारवाई मात्र होत नाही याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकाकडून सांगण्यात येत आहे. या सर्व बाबीवर आळा घालण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन सदर समितीच्या वतीने धरणे आंदोलन केले असता तहसीलदार यांनी आश्वासन देऊन सदरील उपोषण मागे घेण्यास प्रावर्त केले आहे. लवकर कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा भ्रष्टाचार निर्णय समिती रस्त्यावर येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. अवैध व ओव्हर लोड वाहतूक जर बंद होत नसेल तर स्वतः समिती गाड्या पकडून तहसीलदार व पोलीस विभागाला कारवाईसाठी ताब्यात देतील असा इशारा दिले आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस राजु पा. शिंपाळकर, जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे सो.मिडीया जिल्हाध्यक्ष सय्यद रियाज ,गंगाधर शिंदे तालुका आध्यक्ष , सुनिल जेठे ता.उपाध्यक्ष,आत्माराम पा. हनिफ ईनामदार , शिवानी देशमुख, रोजेश्री भरांडे, शंकर पवार , शेख आस्मा ,सह अनेक जन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment