शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे शिरूर शहरप्रमुख व मा. नगरसेवक संजय देशमुख यांचे बंधू, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र देशमुख यांचे दुःखद निधन..!
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
शिरूर शहरप्रमुख व माजी नगरसेवक संजय देशमुख यांचे बंधू, सामाजिक बांधिलकी जपणारे बांधकाम व्यावसायिक राजेंद्र देशमुख यांचे निधन.
शिरूर, शहरातील ज्येष्ठ व मान्यवर बांधकाम व्यावसायिक राजेंद्र दत्तात्रेय देशमुख (वय ५७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरूरच्या सामाजिक, धार्मिक व व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र देशमुख हे अत्यंत शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व होते. बांधकाम क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवताना नेहमी प्रामाणिकपणा व दर्जा जपला. शहरातील अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणं हे त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य होतं. त्यांच्या जाण्याने शिरूरने एक सुसंस्कृत, कर्तव्यनिष्ठ आणि संवेदनशील व्यक्ती गमावली आहे.
राजेंद्र देशमुख हे शिरूर शहरातील खंबीर व संघर्षशील नेतृत्व असलेल्या संजय देशमुख यांचे बंधू होते. संजय देशमुख हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिरूर शहरप्रमुख असून, शिरूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवकही आहेत.
संजय देशमुख यांनी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिक आणि आक्रमक भूमिका बजावली आहे. शिरूर शहराच्या विकासासाठी त्यांनी सतत आवाज उठवला असून, सर्वसामान्य जनतेशी नेहमीच घट्ट नातं ठेवले आहे. सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात त्यांनी जेव्हा गरज भासली, तेव्हा मदतीचा हात पुढे करत समाजात आपली वेगळी छाप निर्माण केली. बंधूंच्या अचानक जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांनी संपूर्ण कुटुंब सावरत धैर्याने परिस्थिती हाताळली आहे.
राजेंद्र देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ संजय देशमुख, तसेच तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
No comments:
Post a Comment