जून मध्ये देवळी-वर्धा येथे राज्यव्यापी अधिवेशनास समाजाला निमंत्रण-फडणवीस राहणार कार्यक्रमाचे मुख्य अतिथी



प्रविण भोंदे

नागपूर : शनिवार दिनांक १७ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष व खासदार  रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, उपाध्यक्ष  संजयजी विभूते, सहसचिव  बळवंतराव मोरघडे, प्रदेश युवाआघाडी अध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष सौ. पुष्पा बोरसे, नागपूर विभागाध्यक्ष जगदिश वैद्य, ठाणे विभागाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, प्रदेश युवा कार्याध्यक्ष नंदकिशोर दंडारे, प्रविण बावनकुळे इ. समवेत होते.सदर भेटी दरम्यान येत्या जून २०२५ मधे देवळी-वर्धा येथे तेली समाजाचे राज्यव्यापी अधिवेशनाकरीता निमंत्रण देण्यात आले. सदर अधिवेशनास मान.मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणविस साहेब यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाण्याचे कबूल केले असून त्यांचे सवडीने लवकरच पुढील महिन्यातील तारीख निश्चित करण्यात येईल.

शनिवारी या मॅरेथाॅन बैठकी दरम्यान केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाबाबत देवेंद्र फडणविस यांचे आभार मानतांना समाजाचे काही प्रलंबित प्रश्नांंबाबत चर्चा केली. सदर चर्चेमध्ये प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

◾१) श्री संत संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा..

◾२)मध्यप्रदेशच्या धर्तीवर तेलीघाणीच्या विकासासाठी तेलीघाणी विकास महामंडळ स्थापन करावे..

◾३) सिडको नवी मुंबई येथे भूखंड त्वरीत मिळावा..

◾४)श्रीक्षेत्र सुदुंबरे विकासासाठी २०० कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा..

◾५) तेली समाजातील छोटे व्यापारींवरील लादलेले सुटे तेलावरील जाचक निर्बंध त्वरीत उठवावे..इत्यादी..

तसेच अनेक सामाजिक समस्या व प्रश्नांवर चर्चा झाली. फडणवीस यांनी समस्यांचे तातडीने निवारण करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले..

No comments:

Post a Comment