शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्याने पिकांचे प्रचंड नुकसान; स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे तेजस यादव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नुकसानभरपाईची मागणी..!



शिरूर, गेल्या सात दिवसांपासून शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिके, आंबा, डाळिंब व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष तेजस यादव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

कडक उन्हाळ्यातही पिकांची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका

उन्हाळ्यातील कडाक्याच्या उन्हातही पाण्याची कमतरता असूनसुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि फळबागांची काळजी घेतली. मात्र अवकाळी आलेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी त्यांची ही मेहनत काही क्षणांतच उद्‌ध्वस्त केली. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे.

 प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी – तेजस यादव यांची मागणी

तेजस यादव यांनी आपल्या पत्रात प्रशासनास व शासनास विनंती केली आहे की, तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी. त्यांनी काल शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आज तालुका कृषी अधिकारी यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क करून सदर माहिती दिली असून तातडीची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे:

शंकरराव लांडगे, आशुतोष लांडगे, बाळासाहेब चव्हाण, दादा शिवले, अनिल चव्हाण, चंद्रशेखर काळे

या शेतकऱ्यांची पिके पूर्णतः उध्वस्त झाली असून, तातडीच्या भरपाईची आवश्यकता आहे.

 स्थानीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला

तलाठी आबासाहेब रुके व कृषी अधिकारी रासकर मॅडम यांना यासंदर्भात कळविण्यात आले असून त्यांनी संबंधित भागात पंचनामे करण्याची तयारी दर्शवली आहे.

शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा – अन्यथा शेतकरी आक्रोश करणार

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून, पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आवाज उठवणाऱ्या स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे तेजस यादव यांची ही भूमिका निश्चितच प्रेरणादायी व लक्षणीय आहे.

No comments:

Post a Comment