सस्ती अदालत योजनेचा लाभ घ्यावा
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे होत असलेल्या शासनाच्या वतीने गाव स्तरावरील नकाशातील पानदन रस्ते, शेत रस्ते, अतिक्रमणातून मोकळे करण्यासाठी सस्ती अदालत उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासनाची ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले आहे. सदरचा उपक्रम राबविण्याकरिता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी तालुका स्तरावर समितीचे आयोजन केले जाणार असल्याने त्याचा लाभ संबंधित नागरिकांना होणार आहे.
Labels:
सामाजिक
No comments:
Post a Comment