रात्रीचा चाले रस्ता फोडून टाकतात गॅस पाईपलाईनचा खेळ उघड होईल का? चौकशी करून याकडे लक्ष द्या – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..!



पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 


शिरूर,रात्रीच्या अंधारात रस्ता फोडून टाकलेल्या गैस पाईपलाईनची चौकशी करण्यात यावी – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना दिनांक १२/०५/२०२५ रोजी WhatsApp मेसेजद्वारे माहिती देण्यात आली होती की, शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये कल्याणी भेळ समोरील कोपरा ते शिरूर बसस्थानक (रेव्हेन्यू कॉलनी रस्ता) या मार्गावर रात्रीच्या अंधारात रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करून टोरंट गैस प्रा. लि. या संस्थेने गैस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत आपणास पूर्वीही WhatsApp मेसेजद्वारे माहिती देण्यात आलेली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून टोरंट गैस कंपनी शिरूर नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीने शहरातील डी.पी. रोडमध्ये गैस पाईपलाईन टाकत आहे आणि आता ती पूर्ण झाली आहे. याबाबत वेळोवेळी आपणास माहिती देण्यात आली आहे. मात्र, शहरातील प्रशासन टोरंट गैस या संस्थेसाठी शासन निर्णयांची पायमल्ली करत असून, टोरंट गैससाठी विविध प्रकारे सवलती दिल्या जात आहेत, हे आपल्या निदर्शनास आणण्यात आले आहे.

शहरातील चांगल्या रस्त्यांचे खोदकाम करण्याची परवानगी शिरूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी देतातच कसे? हा प्रश्न शहरातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता फोडून गैस पाईपलाईन टाकण्याची गरज होती का? गैस पाईपलाईन टाकली नसती, तर काय शहरातील नागरिकांच्या घरातील शेगड्या पेटणार नव्हत्या का? नागरिक गॅस नसल्यामुळे उपाशी राहणार होते का? कोणाच्या हट्टापायी चांगला रस्ता फोडण्यात आला?

नगरपरिषद प्रशासन टोरंट गैस या संस्थेस कधी भूमिगत पाईपलाईन टाकण्यास परवानगी देते, तर कधी उघडपणे रस्ता फोडून पाईपलाईन टाकण्यास परवानगी देते. तर कधी डी.पी. रोडमध्येच परवानगी देते. एवढ्या पायघड्या कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून घालण्यात येत आहेत?

या प्रकरणाची सखोल चौकशी तातडीने करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने वेळेवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा ठाम इशारा मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड व मनसेचे शिरूर शहर सचिव रवी लेंडे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment