निंबोळा येथे निंबाई चरणी महायज्ञात १०५ दांम्पत्याचा संकल्प
शासनाच्या शाळांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात रोखण्यासाठी उपक्रम
प्रतिनिधी | नांदुरा
जिल्हा परिषद शाळांचे खासगीकरण थांबवावे, नांदुरा येथील शेतकरी पुत्र -कन्या अभ्यासिकेचा पॅटर्न राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवण्याची सक्ती करून गाव तेथे अभ्यासिका सुरु करण्याची सद्बुद्धी शासनाला द्यावी. यासाठी नांदुरा तालुक्यातील सरपंच व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या १०५ जोडप्यांनी महायज्ञातून संकल्प करत आहुती दिली. हे अनोखे आंदोलन रविवार, २४ डिसेंबर रोजी शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी व शैक्षणिक विकास क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळात आजही दर्जेदार शिक्षण दिले जात असले तरी रिक्त पदे ठेऊन शासन हक्काच्या शिक्षणापासून गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासूनच वंचित ठेवण्याचा डाव रचत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू नये म्हणून खरे तर शासनाला याची जाग यावी यासाठी या संकल्प महायज्ञाची संकल्पना पुढे करण्यात आली आहे. सोबतच नांदुरा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत संस्थापक अध्यक्ष राजेश गावंडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका ही गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी फलदायी ठरली असून कितीतरी विद्यार्थी यातून नोकरीला लागले आहे. हाच अभ्यासिकेचा पॅटर्न राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवून गाव तेथे अभ्यासिका सुरु करा या मागणीसाठी निंबाईच्या चरणी १०५ दांपत्यानी संकल्प महायज्ञातून शासनाला जागी करण्याचे कार्य पार पाडले. यावेळी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान धांडे, उपसभापती प्रदीप हेलगे व इतर मान्यवरांचा ग्रामगीता देऊन सत्कार केला.
No comments:
Post a Comment