सौदाचिठ्ठी केलेले १९ प्लॉट डबल विक्रीचा केला प्रयत्न
नांदेड : शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गॅलेक्सी पार्कमधील १९ प्लॉटची ३७ लाख ६० हजार रुपयांमध्ये नोटरीवर सौदाचिठ्ठी केल्यानंतर त्या प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करुन ते डबल विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यात एका महिलांचाही समावेश आहे. मोहम्मद इमोदोद्दीन सिद्दीकी म.अ.रहमान सिद्दीकी रा. विसावा नगर यांनी या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी अब्दुल खादर अब्दूल हाफीस उर्फ आवेस, मोहम्मद अब्दूल मोहसिन अब्दुल लतीफ, शेख आयुब शेख इब्राहिम, शेख सत्तार शेख इस्माइल यांनी तक्रारदार यांच्याकडून ३७ लाख ६० हजार घेतले होते. त्या बदल्यात गॅलेक्सी पार्कमधील ए १० ते ए २८ अशा एकुण १९ प्लॉटची सौदाचिठ्ठी नोटरी रजिस्टर करुन घेण्यात आली
होती. त्यानंतर आरोपींनी विश्वासघात करुन खोटे दस्तावेज दाखवून हे प्लॉट डबल विक्रीचा करार केला. तक्रारदारासोबत झालेल्या विक्रीच्या कराराची पूर्ण माहिती असताना बनावटी व्यवहार करुन तक्रारदाराची फसवणुक करण्यात आली. अशाप्रकारे तक्रारदार आणि त्यांच्या सहकार्याचा विश्वासघात करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
No comments:
Post a Comment