जाफ्राबाद तालुक्यातील 55 गावात सरपंच पदासाठी चढाओढ, 274 उमेदवारांनी दाखल केला अर्ज सोमवारी होणार छाननी
दर्पण प्रतिनिधी : जाफ्राबाद
जाफ्राबाद : तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटची तारीख होती. दिलेल्या मुदतीत सरपंच पदासाठी 274 तर, सदस्य पदासाठी 1 हजार 154 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. 5 डिसेंबर रोजी या अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी संधी देण्यात येणार आहे.
मुदत संपलेल्या 55 ग्रामपंचायतीत पुढील पाच वर्षासाठी कारभारी निवडण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज सादर करताना अनेकांची मोठी धावपळ झाल्याने पाहायला मिळाले. तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार केशव डकले यांच्या मार्गदर्शनाखाली 20 निवडणूक अधिकारी, 20 सहायक अधिकारी यांनी 20 टेबलवर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. प्राप्त नामनिर्देशन पतरांची छाननी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment