खापरखेडा येथे धार्मिक कार्यक्रम



दर्पण प्रतिनिधी  :  जाफ्राबाद

    जाफराबाद तालुक्यातील खापरखेडा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवारी धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ झाला.सप्ताहानिमित्त दैनंदिन सकाळी सहा ते सात काकडा भजन, साडेआठ ते बारा श्री अभंग गाथा पारायण होणार असून, व्यासपीठावर हभप शश्री शालिकराम महाराज राहणार आहेत. सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा कीर्तन होणार आहे. उर्वरित कालावधीत 3 डिसेंबर रोजी मोकाश महाराज पिशोरकर, चार डिसेंबर रोजी डॉ किशोर महाराज वाशिम, पाच डिसेंबर रोजी मोहन महाराज, सहा डिसेंबर रोजी ब्रह्मनिष्ठ भगवान महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सात डिसेंबर रोजी ब्रह्मनिष्ठ भगवान महाराज यांचे दत्त जन्म किर्तन होणार आहे. आठ डिसेंबर रोजी शालिकराम महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

No comments:

Post a Comment