प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया यजणे अंतर्गत कार्यशाळा संपन्न



# प्रक्रिया उद्योगा करीता कृषि विभागा कडून 35% अनुदान #


दर्यापूर प्रतिनिधी दिपक मेश्राम 


   दर्यापूर, दि. 28 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत अंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी 35% अनुदान व बँक कर्ज ही योजना प्रकल्प संचालक आत्मा अमरावती अर्चना निसाने, तालुका कृषी अधिकारी कु. आरती साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.


मागील वर्षात तालुक्यातील 48 प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे. प्रकल्प मंजुरीत तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही असंघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने सुरू केली असून यातून शेतीमाल उद्योगासाठी वैयक्तिक आणि गट लाभार्थ्यास 10 लाखांच्या मर्यादेत भांडवली गुंतवणुकीच्या 35 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे.


    असंघटित अन्नप्रक्रिया क्षेत्रामधील संबंधित उद्योजक जे बाहेरून कर्ज घेण्यास पात्र नाहीत. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च व मानांकनाचा अभाव असतो. यावर सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न  प्रक्रिया उद्योग योजनेला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून. 


    तांत्रिक ज्ञान, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि इतर पायाभूत सुविधा देऊन असंघटित क्षेत्रात सूक्ष्म उद्योजकांची क्षमता बांधणी करणे, अस्तित्वातील उद्योगाच्या पतमर्यादा वाढविणे, सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व एफपीओ, बचत गट, सहकारी संस्था यांना पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून योजनेसाठी शेतकरी उत्पादक संस्था, बचतगट, सहकारी संस्था व वैयक्तिक लाभार्थी अर्ज करू शकतात. या योजनेसाठी कृषी विभागाकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, आधार व बँक खात्यास जोडला असलेला मोबाईल क्रमांक, ई-मेल, इलेक्ट्रिक बिल, मशिनचे कोटेशन, जागेचा आठ अ, जागा भाड्याने असल्यास करारनामा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

      कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकार्यांच्या मार्गदर्शनात बँकांना भेटी दिल्या जात आहे.

     सद्या अन्नप्रक्रिया उद्योगास मोठा वाव असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. बचत गट, एफपीओ, शेतकरी, बेरोजगार युवकांनी पुढाकार घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा अमरावती यांनी केला आहे. यावेळी कृषी अधिकारी व शेतकरी गटातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजने विषयी मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमाचे मुख्य शेतकऱ्यांना सध्यस्थिती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. 

      यावेळी यावेळी उपस्थित मा. सौ मंगलाताई तराळे उपसभापती महिला व बाल कल्याण नगरपरिषद, दर्यापूर तसेच नगरसेविका मा. सौ वंदनाताई सोलकी, नगरसेवक मा.असलम घाणीवाले,श्री गोघरे ,AFO, कु गायत्री धजेकर सहा कृ अ., प्रामुख्याने उपस्थित होते. 

     कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), दर्यापूर तालुका तंत्र व्यवस्थापक सागर बोंडे, आत्माचे सहा. तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. विशाल भडके  यांनी मार्गदर्शन केले. व नगरपरिषद संयोगिनी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment