लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
श्री आईबाबा बहूउद्देशीय संस्था सालतवाडाचा स्तुत्य उपक्रम लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.
श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने भक्तीधाम मंदिर, समता नगर (ज्ञानपीठ हायस्कूलजवळ), मूर्तिजापूर येथे लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर, रुग्णसेवक व रक्तदात्यांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिषभाऊ पिंपळे, मूर्तिजापूर नगराध्यक्ष हर्षलभाऊ साबळे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसादजी दुबे, नगरसेवक कैलासभाऊ महाजन, रुग्णसेवक रवीभाऊ माडकर, समाजसेवक अशोकजी थोरात, प्रा. गोवर्धनजी इंगोले, सत्यनारायणजी तिवारी (स्वच्छता अभियान, मूर्तिजापूर), सोहनजी सरोवरे (सिंधू बँक व्यवस्थापक), शेतकरी नेते अरविंदभाऊ तायडे, मुकेशभाऊ काळबांडे, मीराताई बोंडे, विष्णूभाऊ लोडम, कोमलभाऊ तायडे, बाळासाहेब खांडेकर, माजी प्राचार्य रणबावळे सर, महादेवभाऊ इंगोले, सुनीलभाऊ भोजगडिया, रविभाऊ चौहाण,अनिलभाऊ जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व प्रथम मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरवात करण्यात आली,उपस्थित सर्व मान्यवरांचा श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था, सालतवाडा यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते आणि समाजात मानवतेचा संदेश अधिक दृढ होतो.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी रक्तदाते रवीभाऊ माडकर, गजाननभाऊ चव्हाण आणि विलासभाऊ वानखडे यांचा उल्लेख "मूर्तिजापूरची त्रिशक्ती" असा गौरवपूर्ण शब्दांत करत त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.मूर्तिजापूर मध्ये पहिल्यादांच पेशंटसाठी रक्त उपलब्ध करून देणारे व झटणारे रुग्णसेवकांचा सन्मान करण्यात आला,
या प्रसंगी रुग्णसेवक विलासभाऊ वानखडे, रवीभाऊ माडकर, तुषारभाऊ जंगले, आकाशभाऊ डहाके, रोहितभाऊ जोगी, प्रथमेशभाऊ धानोकार, शुभमभाऊ शिंगरूप, वैभवभाऊ वानखडे, इम्रानभाई तसेच पोलीस दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले गजाननभाऊ ठाकरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते,पोलीस,महिला, पुरुष, युवक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करून उपक्रम यशस्वी केला.
या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विलासभाऊ वानखडे, इम्रानभाई , रविभाऊ चौहाण, वैभवभाऊ वानखडे, गजानन चव्हाण,अजयभाऊ दांडगे, रणजित सिरसाट यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या समाजहिताच्या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशाच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.कायक्रमाचे सूत्रसंचालन गजाननभाऊ चव्हाण व आभार विलासभाऊ वानखडे यांनी केले

No comments:
Post a Comment