गलवाड्यात शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रतिनिधी सोयगाव ..दिलीप मोरे...
सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजसेविका सुशीलाबाई इंगळे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात गावातील विद्यार्थ्यांनी शिवशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन व पेन्सिल यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून शिक्षणासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आनंदा इंगळे, मिलिंद सोनवणे, गोपाल इंगळे, गोपाल मंडवे, विक्रम इंगळे, दिनेश जाधव, उत्तम कांबळे, सुशील कांबळे, भारत सोनवणे, जितेंद्र सोनवणे, विजय औरंगे, राहुल इंगळे, संजय कुनगर, अमोल दाभाडे, अनिल इंगळे, सुनिल सैदाणे, जीवन पाटील, भारत इंगळे, गोविंदा सोनवणे, सागर बिऱ्हारे, एकनाथ खलसे, राहुल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment