साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेसतर्फे विनम्र अभिवादन



 समता व सामाजिक न्यायाचा विचार जपण्याचा निर्धार

सिल्लोड, प्रतिनिधी :

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक, पंचायत समिती सिल्लोड येथे त्यांच्या स्तंभास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. निलेश काळे, सिल्लोड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आवेज आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल अग्रवाल, एनएसयूआयचे तालुका अध्यक्ष अमन मुलतानी, दिलीप राऊत, रवींद्र काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व लोकशाहीर म्हणून असलेल्या कार्याचा गौरव केला. शोषित, वंचित, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या वेदना आपल्या लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ साठे हे सामाजिक न्याय, समता आणि मानवतेचे खरे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात बंधुता, समानता आणि न्यायाची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी महान साहित्यिक, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.


No comments:

Post a Comment