वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी



*प्रतिनिधी : डॉ. अनिकेत मेस्त्री*

आबलोली (गुहागर) :*गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयक्युएसी (IQAC) अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते *वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रमोद देसाई यांनी वसंतराव नाईक यांच्या सामाजिक, राजकीय व कृषी क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले, "वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख असून ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्रासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले."

कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, प्रा. लंकेश गजबिये, प्रा. सौम्या चौधुले, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार *प्रा. सौम्या चौधुले यांनी मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment