संपूर्ण महाराष्ट्रासहित जत तालुक्यातील सर्व दवाखाने , लॅबोरेटरी सोमवारी बंद
प्रतिनिधी :- मोहसीन इनामदार, जत
डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिकेतील रुग्णालयातील डॉक्टरांवर व परिचारिकेवर झालेल्या हिंसक मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व दवाखाने ,लॅबोरेटरी अत्यावश्यक सेवा वगळता सोमवार दिनांक 20/07/2026 रोजी सकाळी 6 ते मंगळवार दिनांक 21/07/2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास आरोग्य सेवा मागे घेण्याचा निर्णय नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (NIMA ) या संघटनेने घेतला आहे . या एक दिवसीय आंदोलनाच्या दरम्यान
* सर्व नियमित ओपीडी सेवा बंद राहतील
* नियोजित शस्त्रक्रिया व नियमित सेवा स्थगित राहतील
* आपत्कालीन चिकित्सा ,अतिदक्षता विभाग , प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार अखंडित सुरु राहतील .
या आंदोलनात राज्यभरातील सर्व आयुर्वेदिक , ऍलोपॅथि, होमिओपॅथी ,वैद्यकीय विविध संघटना , परिचारिका संघटना , लॅबोरेटरी संघटना , आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य सेवेशी निगडित विविध संघटनांचा सहभाग राहणार आहे NIMA संघटनेने या बंद चा हेतू सर्वसामान्य रुग्णांच्या विरोधात नसून राज्यातील आरोग्य सेवा हिंसामुक्त करण्याकरिता , पीडित डॉक्टर व परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्याकरिता आणि डॉक्टर , परिचारिका , पॅरामेडिकल कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना सुरक्षित , सन्मानजनक , भयमुक्त कार्यस्थळी काम करता यावे ह्या साठी हे आंदोलन असल्याचे स्पष्ट केले आहे संघनेच्या ज्या मागण्या आहेत त्यावर ठोस सकारात्मक निर्णय न झाल्यास दिनांक 09 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत आंदोलन करण्यात येईल . आरोग्य सेवा संबधीत सर्व संघटना (युनायटेड मेडिकल फ्रंट ) म्हणून एकत्रित येऊन सहभागी होतील . अशी माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ . महेश पट्टणशेट्टी यांनी दिली या वेळी डॉ . राजेश जिवनव्वर , डॉ . प्रदीप शिंदे , डॉ , विवेकानंद राऊत , डॉ सुनील वनकुद्रे ,सतीश मोगले, रवीकुमार जीवनव्वर , डॉ . शिवाजी खिलारे हॉपियोपॅथी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ . सचिन वाघ , डॉ संजय व्हनखंडे ,डॉ . मेघा वाघ IMA संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ . रोहन मोदी , शरद पवार , IDA चे तालुका अध्यक्ष डॉ . मदन बोर्गीकर , डॉ . सचिन ऐनापुरे ACLAP तालुका अध्यक्ष मोहसीन इनामदार , करण पाटील , नेताजी खरात , दिलीप व्हनखंडे , हुसेनपाशा इंडीकर , शिवानंद तेलसंग , रवी राठोड , रमजान मुल्ला , रियाज शेख ,समाधान माने , प्रशांत नरुटे , अमोल बिराजदार इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते

No comments:
Post a Comment