NH 965G हायवेवरील अपघात रोखण्यासाठी शिवसेनेचा एल्गार
प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत
उपविभागीय अधिकारी जत यांच्या सोबत सकारात्मक चर्चा, उद्या शेगावात हायवे ऑथोरिटीच्या अधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जी (NH 965G) वर शेगाव (ता. जत) येथे वाढत्या अपघातांमुळे धोकादायक ठरलेला ‘ब्लॅक स्पॉट’ तातडीने दुरुस्त करावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना जत तालुक्याच्या वतीने आगामी १६ जुलै रोजी 'रस्ता रोको' आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना जत तालुकाप्रमुख मा. श्री. अंकुश हुवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जतचे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून तातडीने दखल; उद्या शेगावात बैठक उपविभागीय अधिकारी या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) पंढरपूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी NHAI पंढरपूर विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्या, दिनांक १५ जुलै रोजी थेट शेगाव येथे जाण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांनी शेगाव ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन, अपघात रोखण्यासंदर्भातील प्रशासनाची भूमिका लेखी स्वरूपात द्यावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. प्रमुख मागण्या काय आहेत? * स्पीड ब्रेकर बसवणे: महामार्गावरील शेगाव येथील धोकादायक 'ब्लॅक स्पॉट' बनलेल्या ठिकाणी तात्काळ गतीरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत. * दिशादर्शक फलक लावणे: वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी स्पष्ट दिशादर्शक व सुरक्षा फलक लावण्यात यावेत. * अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना: या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती सर्व तांत्रिक कार्यवाही तातडीने करावी. आंदोलनाचा निर्णय उद्याच्या बैठकीवर अवलंबून शिवसेनेने पुकारलेल्या या रस्ता रोको आंदोलनाला शेगावमधील सर्व ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन आता सर्वपक्षीय बनले आहे. उद्या (१५ जुलै) शेगाव ग्रामपंचायत येथे प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, यावरच १६ जुलैच्या रस्ता रोको आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन उद्या शेगाव ग्रामपंचायत येथे होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी सर्व शेगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना व आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीला उपस्थित पदाधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत झालेल्या या बैठकीला शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे यांच्यासह शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष तालुकाप्रमुख श्री. दीपक बुरुटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. चंद्रकांत शिंदे, शिवसेना नेते श्री. दर्याप्पा जतकर, श्री. शिवकुमार शिंदे आणि ओम साई प्रतिष्ठान शेगावचे अध्यक्ष श्री. मारुती (बबलू) शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment