महावितरणचा भोंगळा कारभार, सुरोडी ते ढोरजा मार्गावर जीवघेणा धोका



दर्पण न्यूज श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी 

सुरोडी ते ढोरजा मुख्य मार्गावरील विजेचे खांब वाऱ्यामुळे जमिनीच्या दिशेने कलले आहेत. यामुळे तारा जमिनीपासून अगदी ७-८ फुटांवर लोंबकळत आहेत. या मार्गावरून ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांची नेहमी ये-जा असते, त्यामुळे येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो.

तलावाच्या पट्ट्यात हे खांब असल्याने, पाऊस वाढण्यापूर्वी महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कचरूसेठ वागसकर यांनी केली आहे. महावितरणच्या या भोंगळ्या कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


No comments:

Post a Comment